धनंजय मुंडेंना अजित पवार पाठिशी घालतायत, करुणा मुंडेंचा गंभीर आरोप

”अजित पवार यांनी मला भेटीसाठी वेळ दिली नाही. याचं कारण म्हणजे अजित पवार हे धनंजय मुंडे यांना पाठीशी घालण्याचं काम करत आहेत”, असा गंभीर आरोप करुणा मुंडे यांनी केला आहे. ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा आरोप केला आहे.

करुणा मुंडे म्हणाल्या आहेत की, अजित पवार धनंजय मुंडे यांना पाठीशी घालण्याचं काम करत आहेत. संतोष देशमुख यांच्यासोबत जी वाईट गोष्ट घडली, यात अजित पवार हे धनंजय मुंडे यांना सपोर्ट करत आहेत. संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे. दोन महिने झाले आहेत, अद्यापही त्याला अटक करण्यात आलेली नाही.” त्या म्हणाल्या की, ”आज एका आमदाराचा मुलगा जरी गायब झाला, तरी पोलीस अवघ्या तीन तासांत त्याला शोधून काढते. मात्र निर्घृणपणे हत्या करणाऱ्या आरोपीचा शोध पोलिसांनी अद्यापही घेतलेला नाही.”

Comments are closed.