कोण रुपाली चाकणकर? नेते लोकांना पाठिशी घालण्यासाठी तिथे बसल्यात, शर्मांचा हल्लाबोल Video
मुंबईच्या रूपाली चकणकरवरील करुणा मुंडे: मंत्री धनजंय मुंडे यांच्या घटस्फोटीत पत्नी करुणा शर्मा यांना न्याय मागण्यासाठी महिला आयोगात गेला होतात का? असा सवाल विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना करुणा शर्मा यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “कोण महिला आयोग? रुपाली चाकणकर?..काय म्हणतात तुम्ही?..काय माहिती नाही तुम्हाला?..कोण रुपाली चाकणकर महिला आयोगात केवळ नेते लोकांना पाठिशी घालण्यासाठी तिथे बसल्यात. अवघड आहे…मी राष्ट्रीय महिला आयोगात गेलेली आहे. मी दिल्लीत जाऊन पैसे खर्च करत त्यांना निवेदन दिलेलं आहे. रुपाली चाकणकरांना महिला आयोगातून हटवा, असंही मी म्हटलेलं आहे”, असं करुणा शर्मा म्हणाल्या आहेत. करुणा शर्मा यांनी एबीपी माझाला मुलाखत दिली. यावेळी त्या बोलत होत्या.
खूप काही तक्रारी आहेत, पण आजपर्यंत चाकणकर यांनी काहीही केलेलं नाही : धनंजय मुंडे
करुणा शर्मा म्हणाल्या, कोर्ट केस लढून लढून मला लॉ काय आहे? हे समजलेलं आहे. जो आरोपी आहे, ज्याच्या विरोधात तुमच्याकडे तक्रारी आल्या आहेत. त्याच्यासोबत तुम्ही फोटोत एकत्रित येऊ नये, असा लॉ आहे. पण काल तुम्ही पाहिलं असेल रुपालीताईंनी धनंजय मुंडेंची बाजू मांडलीये. ते आरोपी आहेत ना? माझी त्यांच्याबाबत तक्रार आहे रुपाली चाकणकर यांच्याकडे…खूप काही तक्रारी आहेत, पण आजपर्यंत चाकणकर यांनी काहीही केलेलं नाही.
धनंजय मुंडेंना वाटतं की, कुठेतरी सेटलमेंट व्हायला पाहिजे : करुणा शर्मा
पुढे बोलताना करुणा शर्मा म्हणाल्या, धनंजय मुंडे मला पाच लाख रुपये देत असले असते तर घराचा हप्ता भरता आला असता. 1 लाख 70 हजार रुपये आमच्या घराचा हप्ता आहे. सात महिन्यांचं हे बाकी आहे. दागिने विकून माझं सध्या घर चालत आहे. धनंजय मुंडेंना वाटतं की, कुठेतरी सेटलमेंट व्हायला पाहिजे. ही आर्थिकरित्या कमजोर झाली तर ही थांबेल, असं मुंडेंना वाटतं. मी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असं दाखवण्यासाठी मी सही करावी, असं धनंजय मुंडेंना वाटतं. करुणा धनंजय मुंडे हे नाव मी हटवावं, असं काहीतरी त्यांना हवं आहे. मात्र, ते काही मी काही करणार नाही.
https://www.youtube.com/watch?v=jiqkaQ3ggha
इतर महत्त्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Comments are closed.