करुणानिधींच्या नातवाची बँक मॅनेजरला मारहाण.

वृत्तसंस्था, चेन्नई

तामिळनाडूतील मातब्बर राजकीय परिवाराचे नाव एका गुन्ह्यात समोर आले आहे. माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांच्या नात आणि माजी केंद्रीय मंत्री एम.के. अलागिरि यांच्या कन्या कायलविझी यांच्याविरोधात चेन्नई पोलिसांनी स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापनाला थप्पड लगावणे आणि धमकाविण्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदविला आहे.

चेन्नईच्या अडयार भागातील एसबीआयच्या एनआरआय शाखेत ही घटना घडली आहे. पोलिसांनुसार कायलविझी यांनी बँक शाखा व्यवस्थापकाच्या कक्षात जात त्यांना थप्पड लगावली. ही घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच हे प्रकरण आणखी चर्चेत आले आहे.

एसबीआयच्या एका अधिकाऱ्याच्या तक्रारीच्या आधारवर एफआयआर नोंदविण्यात आला आहे. कायलविझी यांनी बँक मॅनेजरला मारहाण करत धमकाविल्याचा आरोप तक्रारीत नमूद आहे. पोलिसांनी याच आधारावर कायलविझी विरोधात कायदेशीर कारवाई सुरू केल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.

ज्या इमारतीत एसबीआयची एनआरआय शाखा संचालित होते, ती कायलविझी यांच्या मालकीची आहे. काही दिवसांपूर्वी त्या या व्यावसायिक इमारतीची पाहणी करण्यासाठी पोहोचल्या असता लिफ्ट खराब आढळून आली होती. यावरून त्यांचा बँक व्यवस्थापकासोबत वाद झाला. याच वादातून त्यांनी बँक व्यवस्थापकाला थप्पड  लगावल्याचे पोलिसांचे सांगणे आहे.

Comments are closed.