घरकुल योजनेचे आमिष दाखवून ४ लाखांची फसवणूक, विजय थलपती यांच्या नावाचा गैरवापर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत घर मंजूर झाल्याचे आमिष दाखवून काशिगाव येथील एका महिलेची तब्बल ४ लाख १४ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाली आहे. या फसवणुकीसाठी सायबर भामट्यांनी दाक्षिणात्य अभिनेता व तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती यांच्या नावाचा गैरवापर केला आहे.

काशिगाव येथील निलकमल बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या सीमा पाटील यांना व्हॉट्सअॅपवर एका अनोळखी आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून यूट्यूबची लिंक पाठवण्यात आली. त्यानंतर संपर्क साधणाऱ्या अज्ञात व्यक्तीने विजय थलपती यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत सीमा पाटील यांचे नाव मंजूर झाल्याचा बनाव केला. घरकुल योजनेचे अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा होणार असून त्यासाठी आवश्यक कागदपत्रे व प्रक्रिया पूर्ण करावी लागेल असे सांगून पैसे उकळले. सीमा पाटील यांनी भामट्याच्या सांगण्यावरून आपल्या दोन बँक खात्यांमधून विविध फोन-पे क्रमांकावर तब्बल २३ वेळा ४ लाख १४ हजार रुपये ट्रान्सफर केले. – आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सीमा पाटील यांनी नॅशनल सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार नोंदवली.

Comments are closed.