पालघर साधू हत्याकांड प्रकरणात आरोप झाल्याने भाजप प्रवेश स्थगित; आता काशिनाथ चौधरी ढसाढसा रडले;


काशिनाथ चौधरी: पालघर साधू हत्याकांड (Palghar sadhu case) प्रकरणात भाजपने मागील काळात काशिनाथ चौधरी (Kashiram Chaudhari) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यातच भाजपमध्ये (BJP) काशिनाथ चौधरी यांना प्रवेश देण्यात आला. यामुळे राज्यभरातून विरोधकांकडून गंभीर आरोप करत भाजप टीकेची झोड उठवली. यानंतर विरोध लक्षात घेता भाजप पक्षश्रेष्ठींनी काशिनाथ चौधरी यांच्या भाजप पक्षप्रवेशाला स्थगिती दिली. या पार्श्वभूमीवर काशिनाथ चौधरी यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना काशिनाथ चौधरी चांगलेच भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

काशिनाथ चौधरी म्हणाले की, प्रसार माध्यमांवर येणाऱ्या बातम्यांमुळे माझ्या कुटुंबाला प्रचंड मानसिक त्रास झालाय. समाज माध्यमांवर प्रतिमा मलीन केली जात आहे. आमचं जगणं मुश्किल केलेलं आहे. व्यक्तिगत मी सगळं सहन केला असतं. मी अत्यंत संघर्षातून आलेला कार्यकर्ता आहे. अत्यंत प्रामाणिकपणे काम करत आहे. या राजकारणासाठी माझं राजकीय करिअर उद्ध्वस्त झालं तरी चालेल. परंतु यात माझे कुटुंब, माझी मुलं भरडले जात आहेत. मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतोय की, मी पोलिसांच्या मदतीसाठी गडचिंचले येथे गेलो होतो. मात्र मलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं. साधूंचा जीव वाचावा म्हणून पोलिसांनी मला तिथे नेलं. मात्र, जमाव इतका आक्रमक होता की आम्हाला तो सांभाळात आला नाही. कृपया यात वेगळा रंग देण्याचा कोणीही प्रयत्न करू नका, असे म्हणत त्यांना अश्रू अनावर झाले.

Kashinath Chaudhari: मी कार्यकर्ता म्हणून भाजपचेच काम करेन

मला राजकीय आता काहीही बोलायचं नाही. भाजप प्रवेशाबद्दल माझं जिल्हा स्तरावरील पदाधिकाऱ्यांशी बोलणं झालं होतं. भाजपने आरोप केले. मात्र, मला काहींनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. त्याचा मला आणि माझ्या कुटुंबाला प्रचंड मानसिक ताण होतोय. मात्र, आता मी भाजप प्रवेश केलेला आहे. त्यामुळे मी कार्यकर्ता म्हणून भाजपचेच काम करेन, असे देखील काशिनाथ चौधरी यांनी म्हटले.

Who is Kashinath Chaudhari: कोण आहेत काशिनाथ चौधरी?

काशिनाथ चौधरी हे पालघर जिल्ह्यातील एक राजकीय नेते आहेत. भाजपने त्यांच्यावर पालघर साधू हत्याकांडात मुख्य सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप केला होता. मात्र अलीकडे त्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. चौधरी हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) चे स्थानिक नेते होते. पण, 16 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांनी शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. यानंतर विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठवली. त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्षांनी काशिनाथ चौधरी यांचा पक्ष प्रवेश स्थगित केला.

आणखी वाचा

Palghar News: पालघर साधू हत्याकांड प्रकरणात आरोप झालेल्या काशीनाथ चौधरींच्या भाजप प्रवेशाला स्थगिती; विरोधकांनी टीकेची झोड उठवताच प्रदेशाध्यक्षांचा निर्णय

आणखी वाचा

Comments are closed.