कश्मीर गोठले पारा शून्याच्या खाली उतरला, श्रीनगरमध्ये उणे 2.6, तर हिमाचल प्रदेशात उणे 4.2 डिग्री तापमान
कश्मीर खोऱयात किमान तापमानात मोठी घट नोंदवली गेली आहे. अनेक ठिकाणी पारा शून्याखाली नोंदवला गेला. हवामान विभागाच्या माहितीनुसार, श्रीनगरमध्ये किमान तापमान -2.6 डिग्री होते. जम्मू-कश्मीरमध्ये सर्वात कमी तापमान सोनमर्गचे होते, जिथे तापमान -5.8 डिग्री नोंदवले गेले. हिमाचल प्रदेशातील कुकुमसेरी येथेही तापमान 0 च्या खाली -4.2 डिग्री नोंदवले गेले.
हवामान विभागाने मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह 23 राज्यांमध्ये दाट धुक्याचा इशारा जारी केला आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब, दिल्ली, हरयाणा, चंदिगड, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये दाट धुक्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यांतून हवामानाची छायाचित्रे… त्रिपुरातील अगरतळा येथे सकाळी दाट धुके होते. दृश्यमानता खूप कमी होती. श्रीनगरमध्ये शनिवारी सकाळी तापमान -2.6 डिग्री होते. येथे तापमानात मोठी घट झाली आहे.
उत्तराखंडतील 6 जिल्ह्यांत धुक्याचा यलो अलर्ट
उत्तराखंडमधील 6 जिल्ह्यांमध्ये रविवारी धुक्याचा यलो अलर्ट जारी करण्यात आला. पंजाबमध्ये आज धुके आणि शीतलहरीचा अलर्ट होता.
धुक्यामुळे इंडिगोची उड्डाणे रद्द
खराब हवामानामुळे शनिवारी इंडिगो एअरलाइनच्या देशभरातील 57 उड्डाणे रद्द झाली. ज्या विमानतळांवरून उड्डाणे रद्द झाली त्यात चंदिगड, दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, हैदराबाद, अमृतसर, बंगळुरू, कोलकाता, चेन्नई, जयपूर, पुणे आणि गया यांचा समावेश आहे. रविवारीही 13 विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली. आयएमडीने 10 डिसेंबर ते 10 फेब्रुवारी या कालावधीला ‘फॉग विंडो’ (धुके कालावधी) म्हणून घोषित केले आहे. या काळात कमी दृश्यमानता राहील.
Comments are closed.