मोरे स्मृती स्पर्धेत केडीए, रहेजा, केईएमची दमदार आगेकूच!
आत्माराम मोरे स्मृती आंतर रुग्णालय टी-20 स्पर्धेत केडीए, रहेजा आणि केईएम हॉस्पिटल संघांनी उपांत्यपूर्व फेरीत दणक्यात प्रवेश केला. संकेत किणी (54) आणि दिशांत म्हात्रे यांच्या जोरावर केडीएने किम्सवर 23 धावांनी मात केली. रहेजाने विजय वैतीच्या (46) आक्रमक खेळीच्या बळावर सेव्हन हिल्सवर 14 धावांनी विजय मिळवला. तर केईएमने प्रीतेश सावंतच्या अष्टपैलू कामगिरीतून कस्तुरबावर 24 धावांनी शानदार बाजी मारली. स्पर्धेत चुरशीचे सामने आणि दमदार कामगिरीमुळे रंगत शिगेला पोहोचली आहे. सामन्यातील उत्कृष्ट क्रिकेटपटू डॉ. राकेशकुमार व संकेत किणी यांना पुरस्कार देऊन क्रिकेटपटू धनंजय केतकर, डॉ. विवेक पालकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विनीकुमार मोरे व लीलाधर चव्हाण यांनी गौरविले.
Comments are closed.