केडीएमटीची एसी बससेवा ठप्प; ऐन उन्हाळ्यात ‘जीवघेणा’ प्रवास

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ठेकेदाराचे कंत्राट संपून आठ महिने सरले तरी कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने कोणतीही हालचाल न केल्याने अखेर या ठेकेदाराने चालवलेली एसी बसची सेवा अखेर ठप्प झाली आहे. त्यामुळे कल्याण, डोंबिवलीवासीयांना उन्हाच्या झळा सोसत जीवघेणा प्रवास करावा लागणार आहे.

केडीएमटीच्या माध्यमातून एसी बस चालविणाऱ्या ठेकेदाराचे कंत्राट सुमारे आठ महिन्यांपूर्वीच संपले होते. तरीही त्याने बससेवा सुरू ठेवली होती. मात्र याच ठेकेदाराला मुदतवाढ देणे अथवा नवा ठेकेदार नेमणे याकडे महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी सपशेल डोळेझाक केली होती. केडीएमसीमध्ये प्रशासकीय राजवट संपून लोकनियुक्त प्रतिनिधी सत्तेत आले असताना अशा महत्त्वाच्या सेवांबाबत तातडीने निर्णय घेणे अपेक्षित होते.

त्यामुळे अखेर कंत्राट संपल्यानंतर आठ महिने कशीबशी सेवा चालवत ती शुक्रवारी सायंकाळी बंद करत असल्याचे ठेकेदाराने जाहीर केले. या ठेकेदाराच्या माध्यमातून आठ एसी बसेस शहरात चालवल्या जात होत्या. प्रशासनाने त्वरित निर्णय घेऊन एसी बससेवा तसेच अन्य सुविधा पुन्हा सुरू कराव्यात, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी शाखाप्रमुख राजू नलावडे यांनी केली आहे.

Comments are closed.