मोदीजी सगळं नीट करतील विश्वास ठेवा, गॅस टंचाईबाबत फडणवीसांकडून नागरिकांना आश्वस्त करण्याचा प्रय

महाराष्ट्रात गॅस टंचाईवर देवेंद्र फडणवीस राज्यातील गॅस टंचाई दिवसेंदिवस चिंताजनक स्वरुप धारण करत असल्यामुळे अनेक सामान्य नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. राज्य सरकारकडून राज्यातील एलपीजी गॅस पुरवठा दावा सुरळीत असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात गॅस एजन्सीजकडून सिलेंडरचे (Gas cylinder) बुकिंग घेण्यात दिरंगाई होत असल्याचे चित्र आहे. यामुळे घरातील गॅस संपण्याच्या भीतीने अनेकजण गॅस एजन्सीबाहेर (Gas Shortage) रांगा लावताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्यातील नागरिकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. राज्यात गॅसची कोणतीही टंचाई नाही. केंद्र आणि राज्य सरकारवर विश्वास ठेवा, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले आहे. ते रविवारी राहुरी येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Maharashtra Politics news)

देवेंद्र फडणवीसांनी गॅसच्या तुटवड्यावरुन चिंता करण्याचे कारण नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. त्यांनी म्हटले की, नागरिकांनी केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे वागले पाहिजे. काही राजकीय पक्ष नागरिकांमध्ये जाणीवपूर्वक भीती निर्माण करत आहेत. पॅनिक सिच्युएशन झाली तर असलेली चांगली परिस्थिती खराब होण्याची शक्यता आहे. ही भीती पसरली तर लोक गॅसची साठवणूक करतील. केंद्र सरकार आणि मोदीजी आपल्यासाठी सर्व गोष्टी नीट करताय, त्यावर विश्वास ठेवा, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.

इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका यांच्यातील युद्धामुळे गेल्या काही दिवसांपासून आखाती देशांमधून येणारे खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा ठप्प झाला आहे. भारत खनिज तेल आणि नैसर्गिक वायूसाठी पूर्णपणे आखाती देशांवर अवलंबून आहे. मात्र, आता ही रसदच बंद झाल्याने भारतात एलपीजी, सीएनजी आणि पीएनजी गॅसचा तुटवडा जाण्यास सुरुवात झाली आहे. सरकारकडून पुरेसा गॅस उपलब्ध असल्याचा दावा केला जात असला तरी नागरिकांना अद्याप या दाव्यावर पूर्णपणे भरवसा नसल्याचे चित्र दिसत आहे.

Baramati Bypoll Election 2026: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं भाष्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीबाबत महत्त्वपूर्ण भाष्य केले. त्यांनी म्हटले की, बारामती विधानसभा आणि राहुरी विधानसभा या दोन्ही ठिकाणी बिनविरोध पोटनिवडणूक झाली पाहिजे. मात्र, आमच्यावर निवडणूक लादली गेली तर आम्ही लढायला तयार आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे सांगितले.

आणखी वाचा

अब्जाधीश, गर्भश्रीमतांच्या दुबई इराणी चटक्यांनी होरपळून निघाली अन् आता हजारो किमी अंतरावर असलेल्या लंडनला अचानक सुगीचे दिवस! नेमकं काय घडतंय?

आणखी वाचा

Comments are closed.