केरळ असेंब्लीने 'सर' च्या विरोधात ठराव मंजूर केला

पारदर्शक पद्धतीने मतदारयादी सर्वेक्षणाचे आवाहन

वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम

केरळ विधानसभेने सोमवारी राज्यातील मतदार यादीतील विशेष सघन सुधारणा (एसआयआर) विरोधातील ठराव एकमताने मंजूर केला. या ठरावात निवडणूक आयोगाला मतदारयादीचे पारदर्शक पद्धतीने पुनरावलोकन करण्याचे आवाहन करण्यात आले. मुख्यमंत्री विजयन यांनी हा ठराव मांडला. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी आघाडी ‘युडीएफ’नेही मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी मांडलेल्या ठरावाला पाठिंबा दिला.

विधानसभेत मांडलेल्या ठरावात मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाने ‘एसआयआर’ लागू करण्यासाठी घेतलेल्या घाईघाईच्या पावलांबद्दल आणि या हालचालीमागील गुप्त हेतू असल्याचा संशय व्यक्त केला. निवडणूक आयोग ‘एसआयआर’द्वारे मागच्या दाराने एनआरसी लागू करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. बिहारमध्ये लागू केलेल्या ‘एसआयआर’ने मतदार यादीतून लोकांना पद्धतशीरपणे वगळल्याचा आरोप करत मुख्यमंत्री विजयन यांनी राष्ट्रीय पातळीवरही हाच दृष्टिकोन अवलंबण्याची भीती व्यक्त केली आहे.

Comments are closed.