आधी शेजाऱ्याने हात टाकला, नंतर व्हिडीओ दाखवून प्रत्येकाने ब्लॅकमेल केलं, अल्पवयीन मुलीवरील 62 ज
तिरुअनंतपुरम : देशात महिला, मुली सुरक्षित नसल्याचे अनेक गंभीर प्रकार रोजच समोर येतात. बलात्कार, छेडछाड यासारखे प्रकार देशात कुठल्यातरी कोपऱ्यात घडतच असतो. असे असतानाच आता केरळमध्ये एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 62 जणांनी अत्याचार केल्याचा गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात आता रोज नवनवे खुलासे होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या अल्पवयीन मुलीवर सर्वांत अगोदर तिच्या शेजारच्यानेच हात टाकला होता. त्यानंतर प्रत्येकाने अत्याचाराचा व्हिडीओ दाखवून या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे.
62 नराधमांनी केला अत्याचार
केरळमधील पथानामिथिट्टा जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीवर हा अत्याचार झाला आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. हा प्रकार समोर येताच पोलिसांनी एकूण 14 जणांना ताब्यात घेतलं आहे. सोबतच पोलीस इतर आरोपींच्याही शोधात आहेत. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना सध्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या अल्पवयीन मुलीवर एकूण दोन वर्षांत तब्बल 62 नराधमांनी बलात्कार केल्याचा दावा केला जातोय.
मुलगी 13 वर्षांची असताना अत्याचाराला सुरुवात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात एकूण 14 जण ताब्यात असून या सर्वांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात तपास चालू असून पोलीस इतर आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणी खुद्द अल्पवयीन मुलीनेच तक्रार दिली आहे. पथानामथिट्टा जिल्ह्यातील एकूण दोन पोलीस ठाण्यात मुलीने तक्रार दाखल केली आहे. मुलीचे वय हे 18 वर्षे असल्याचे म्हटले जात आहे. या मुलीने केलल्या आरोपानुसार ती 13 वर्षांची असताना एकूण 62 जणांनी तिच्यावर अत्याचार केला आहे. प्राथमिक पुराव्याच्या आधारावर खेळाचे प्रशिक्षक, सहकारी असलेले अॅथेलेटिक्स तसेच वर्गात शिकणाऱ्या इतर मुलांनी या पीडित मुलीचे शोषण केले आहे.
आधी शेजाऱ्याने केला अत्याचार
हे प्रकरण उजेडात येताच केरळच्या महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. आगामी तीन दिवसांत कारवाई करून, याबाबतचा रिपोर्ट मागितला आहे. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार ती 13 वर्षांची असताना सर्वांत अगोदर एका शेजाऱ्याने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर या मुलीचा अश्लील व्हिडीओ इतरांना शेअर करण्यात आला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ज्या-ज्या नराधमाने हा व्हिडीओ पाहिला, त्या प्रत्येकाने मुलीवर अत्याचार केला आहे.
प्रकरण कसे समोर आले?
बाल कल्याण समितीने एक काऊन्सिलिंगचा कार्यक्रम आयोजित केला होता. याच कार्यक्रमात पीडित मुलीच्या शिक्षकांनी संबंधित मुलीच्या बदललेल्या व्यवहाराविषयी बाल कल्याण समितीच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर बाल कल्याण समितीने हा प्रकार पोलिसांना सांगितला आणि या प्रकरणाला वाचा फुटली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे. भविष्यात या प्रकरणात नेमकं काय समोर येणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
High Court: मृतदेहासोबत शारिरीक संबध ठेवल्यास बलात्कार होतो का? जाणून घ्या हायकोर्ट काय म्हणालं?
अधिक पाहा..
Comments are closed.