केरळचे नामकरण 'केरळम'

नवी दिल्ली: केरळचे नाव बदलून ‘केरलम“ झाले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी केरळचे नाव बदलून ‘केरलम“ करणाऱ्या विधेयकाला मंजुरी दिली आहे. याचबरोबर हे विधेयक आता कायद्यात रुपांतरित झाले आहे. लोकसभेने केरळ (नाम परिवर्तन) विधेयक, 2026 ला मागील आठवड्यातील मंगळवारी संमत केले होते. तर राज्यसभेने बुधवारी हे विधेयक संमत केले होते. केरळ विधानसभेने 2024 मध्ये एक प्रस्ताव संमत केला होता. यात केंद्र सरकारला राज्याचे नाव बदलून ‘केरलम“ करण्यासाठी कायदा लागू करण्याची मागणी करण्यात आली होती. यानुसार केंद्र सरकारने हे विधेयक मांडून राज्याची मागणी पूर्ण केल्याचे राज्यसभेत गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितले होते. संसदेकडून संमत झालेले विधेयक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्य विधानसभेचे मत जाणून घेण्यासाठी विधानसभेकडे पाठविले होते. यानंतर विधानसभेने सर्वसंमतीने प्रस्ताव संमत करत विधेयकाबद्दल सहमती दर्शविली होती.

Comments are closed.