केरळची काझिया मेजो 'मिस युनिव्हर्स इंडिया'

52 सौंदर्यवतींना मागे टाकत ठरली मुकुटाची मानकरी

वृत्तसंस्था/ जयपूर

जयपूर येथे झालेल्या मिस युनिव्हर्स इंडिया 2026 च्या महाअंतिम सोहळ्यात केरळच्या 19 वर्षीय काझिया लिझ मेजो हिने 52 प्रतिभावान स्पर्धकांना हरवून ‘मिस युनिव्हर्स’चा किताब पटकावला. या विजयामुळे काझिया आता नोव्हेंबरमध्ये प्युर्टो रिको येथे होणाऱ्या 75 व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करेल. या स्पर्धेत तामिळनाडूची वैष्णवी गणेश पहिली उपविजेती ठरली. तर, गुजरातची अनुश्री सातवलेकर दुसरी उपविजेती ठरली. विशेष म्हणजे, काझिया ही केरळमधून ‘मिस युनिव्हर्स इंडिया’ किताब जिंकणारी पहिली विजेती आहे.

काझिया मूळची केरळमधील मावेलिक्कारा येथील असून सध्या ती कायद्याचे शिक्षण घेत आहे. तसेच मॉडेलिंग, अभिनय व सार्वजनिक भाषण यांमध्येही ती सक्रिय आहे. मिस युनिव्हर्स स्पर्धेत ‘टॉप’ येत तिने आपले अष्टपैलूत्व सिद्ध केले आहे. काझिया गेल्या 12 वर्षांपासून शास्त्राrय नृत्याचे प्रशिक्षण घेत आहे. तिला गाण्याची आवड असून ती व्हायोलिन देखील वाजवू शकते. तिने ‘शायलॉक’ या मल्याळम चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. काझियाचा जन्म 2007 मध्ये झाला आणि तिने आपले बालपण अबू धाबीमध्ये घालवले. तिने एमिरेट्स नॅशनल स्कूल, सेंट जोसेफ स्कूल आणि अबू धाबी इंडियन स्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर, तिने मॉडेलिंग आणि सौंदर्य स्पर्धांमध्ये आपले करिअर घडवले.

Comments are closed.