केरोसीन आता रॅशकार्डवर उपलब्ध; गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय

शिधापत्रिकांवर रॉकेल | इराण आणि इस्रायलमधील युद्धाचा थेट परिणाम आता भारतावरही जाणवू लागला आहे. ऊर्जा आणि कच्च्या तेलासाठी भारत प्रामुख्याने आखाती देशांवर अवलंबून आहे, त्यामुळे इराण-इस्रायल संघर्षामुळे भारतालाही गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. युद्धामुळे मध्य पूर्वेतील गॅस आणि तेलाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाला आहे. त्याचा थेट परिणाम म्हणून देशभरातील घराघरांत गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.

या पार्श्वभूमीवर एलपीजी गॅसच्या किमती वाढल्या असून सरकारने गॅस बुकिंगचा कालावधीही वाढवला आहे. मात्र, या उपाययोजना करूनही अनेक भागात नागरिकांना वेळेवर गॅस मिळत नाही. त्यामुळे घरात अन्न शिजविणे कठीण झाले असून अनेक कुटुंबांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत आहे. वेळेवर गॅस न मिळाल्याने घरगुती जीवनावर, विशेषत: महिलांच्या स्वयंपाकावर थेट परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. रेशनकार्डांवर रॉकेल

ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकार आणि राज्य सरकारने नागरिकांच्या अन्नसुरक्षेसाठी मोठे पाऊल उचलले आहे. त्यांनी शिधापत्रिकाधारकांना तसेच शिधापत्रिका नसलेल्या नागरिकांना रॉकेल देण्याचा निर्णय घेतला आहे. गॅस सिलिंडर वेळेवर न मिळाल्यास नागरिकांना स्टोव्हवर रॉकेल टाकून जेवण बनवता येणार आहे. त्यामुळे कोणीही उपाशी राहू नये, हा सरकारचा मुख्य उद्देश आहे.

केंद्र सरकारने 37 लाख 44 हजार लिटर रॉकेल (रेशन कार्डावरील रॉकेल) वितरणास मान्यता दिली आहे. यातून राज्य शासनाने जिल्हानिहाय वितरणासाठी ठोस आराखडा तयार केला आहे. मार्च-एप्रिल 2026 दरम्यान, इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या प्रमुख तेल कंपन्यांच्या माध्यमातून राज्यभर रॉकेलचा पुरवठा केला जाईल. राज्य सरकारने सर्व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना गावनिहाय मागणीचा आढावा घेऊन दोन ते तीन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

शासनाच्या योजनेनुसार एकूण रॉकेल वितरणापैकी ८५ टक्के वाटप पहिल्या पंधरवड्यात पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक कुटुंबासाठी किंवा शिधापत्रिकेसाठी 3 लिटर रॉकेल दिले जाईल. तसेच ज्या कुटुंबांकडे शिधापत्रिका नाहीत त्यांनाही रॉकेल मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या स्थितीची चिंता करण्याची गरज नाही.

सरकारच्या या उपायांमुळे घरगुती जीवनाला मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषत: ग्रामीण भागातील नागरिकांना, ज्यांना गॅस नसल्यामुळे नियमित जेवण बनवण्यासाठी त्रास होत होता, त्यांना या रॉकेल पुरवठ्याचा मोठा फायदा होणार आहे.

Comments are closed.