मेलबर्न कसोटी दोन दिवसात संपली, केविन पीटरसन भडकला, भारताचं नाव घेत ऑस्ट्रेलियाला सुनावलं

नवी दिल्ली : ॲशेस मालिकेतील ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील मेलबर्न येथील चौथी कसोटी दोन दिवसात संपली. यावरुन इंग्लंडचा माजी खेळाडू केविन पीटरसन आणि भारताचा माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिक यानं प्रश्न उपस्थित केले आहेत. मेलबर्न कसोटीच्या पहिल्या दिवशी  20 विकेट आणि दुसऱ्या दिवशी  16  विकेट पडल्या. इंग्लंडनं ही कसोटी  4 विकेटनं जिंकली. इंग्लडला 14 वर्षानंतर ऑस्ट्रेलियात विजय मिळवता आला. आता पुढील कसोटी सिडनी येथे होणार आहे.

Kevin Pietersen : केविन पीटरसन भडकला

इंग्लंडचा माजी कॅप्टन केविन पीटरसन यानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे. तो म्हणाला की, “भारतात जेव्हा कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी खूप विकेट पडतात तेव्हा नेहमी भारताला टीकेचा सामना करावा लागतो. आता यामुळं मला अपेक्षा आहे, ऑस्ट्रेलियाला देखील त्याच प्रकारच्या टीकेचा सामना करावा लागेल. न्याय सर्वांसाठी सारखा असायला पाहिजे”.

भारताचा माजी विकेटकीपर दिनेश कार्तिक देखील प्रश्न उपस्थित केले आहेत. एमसीजीची खेळपट्टी साधारण दिसत आहे.ॲशेसच्या चार कसोटी पैकी दोन सामने केवळ दोन दिवसात संपले यावर विश्वास पसत नाही. एवढी चर्चा केल्यानंतर देखील चार ॲशेस कसोटी सामने केवळ 13 दिवसात संपले, असं दिनेश कार्तिक म्हणाला.

मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडच्या खेळपट्टीवर 10 मिमी गवत ठेवल्यानं पिचचा वेगवान गोलंदाजांना फायदा मिळाला.  यामुळं या खेळपट्टीवर फलंदाजी करणं अवघड झालं होतं. इंग्लंडनं ही मॅच 4 विकेटनं जिंकली. ॲशेसमधील पहिल्या तीन मॅच 11 दिवसात संपल्या होत्या. चौथी मॅच दोन दिवसात संपली. म्हणजेच चार कसोटी सामने 20 दिवसात संपायला हवे होते ते केवळ 13 दिवसात संपले. पर्थ कसोटी देखील दोन दिवसात संपली होती.

केविन पीटरसन आणि दिनेश कार्तिक यांनी भारतीय उपखंडात कसोटी दोन दिवसात संपल्यास भारतीय फिरकीपटू किंवा खेळपट्टींवरुन क्रिकेट विश्वातून जोरदार टीका केली जाते. 2020-21 मध्ये अहमदाबाद कसोटी दोन दिवसात संपली होती. भारतीय फिरकीपटूंपुढं इंग्लंडचा टिकाव लागला नव्हता. तेव्हा खेळपट्टीवरुन क्रिकेट जाणकारांकडून टीका करण्यात आली होती.

इंग्लंडनं तेव्हा चेन्नईत पहिली कसोटी जिंकली होती. पुढच्या तीन कसोटी सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांना रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेलच्या गोलंदाजीचा सामना करता आला नव्हता. त्यावेळी ज्या प्रकारे टीका करण्यात आली होती तशी टीका ॲशेसमध्ये वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल खेळपट्टीवरुन करण्यात आली नाही.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.