दारुड्यांनी दुचाकी पेटवल्या; गाड्या फोडल्या, खडेगोळवलीत धुमाकूळ

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

डोंबिवलीतील खडेगोळवली परिसरात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास दारुड्या टवाळखोरांनी धुमाकूळ घालत पार्क केलेल्या असंख्य वाहनांची तोडफोड केली. तसेच दोन दुचाकींना आग लावून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मध्यरात्रीच्या सुमारास काही टवाळखोरांनी खडेगोळवली परिसरात विनाकारण दहशत माजवण्यास सुरुवात केली. दगडफेकीत अनेक वाहनांच्या काचा फुटल्या असून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आगीमुळे जवळील घरांच्या छतांचेही नुकसान झाले. या घटनेमागील नेमके कारण काय, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. टवाळखोरांवर कठोर कारवाई करावी आणि रात्रीच्या वेळी परिसरातील गस्त वाढवावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

Comments are closed.