Kho-Kho WC 2025; टीम इंडियाची विजयी सलामी, रोमांचक सामन्यात नेपाळला लोळवलं

खो खो विश्वचषक 2025 मध्ये भारतीय संघाने विजयी सुरुवात केली आहे. भारताने सलामीच्या सामन्यात नेपाळवर शानदार विजय मिळवला आहे. पहिल्याच सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंनी अद्भुत कामगिरी करत नेपाळला हरवले. या सामन्यात, प्रतीक वायकर संघाने 42-37 असा विजय मिळवला. या विजयासह भारताने गट ‘अ’ मध्ये पहिले स्थान पटकावले. दोन्ही संघांमध्ये एक रोमांचक सामना पाहायला मिळाला. दोन्ही देशांच्या बचावपटू, आक्रमणपटूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.

विस्तारानं बोलायचे झाल्यास टीम इंडियाचा कर्णधार प्रतीक वायरकरने नाणेफेक जिंकून प्रथम आक्रमण करण्याचा निर्णय घेतला. त्याने घेतलेला निर्णय योग्य असल्याचे सिद्ध झाले. एकूण 7 मिनिटांचे 4 डाव खेळवण्यात आली. पहिल्याच डावात संघाने 24 गुण मिळवले. टीम इंडियाच्या आक्रमकांनी चमकदार कामगिरी केली आणि बचाव करताना नेपाळला एकही गुण मिळवू दिला नाही. दुसऱ्या डावात नेपाळने चांगले पुनरागमन केले. डावाच्या अखेरीस दोन्ही संघांचा स्कोअर 24-20 असा होता.

तिसऱ्या डावात आक्रमणात परतताना, भारतीय संघाने लय कायम ठेवली. भारताने 7 मिनिटांच्या खेळात 20 गुण मिळवले. ज्यामुळे संघाचे एकूण गुण 42 झाले. प्रत्युत्तरात नेपाळला सामना जिंकण्यासाठी चौथ्या आणि शेवटच्या वळणावर 43 गुण मिळवायचे होते. पण टीम इंडियाच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी करत नेपाळ संघाला फक्त 37 गुणांवर रोखले. यासह, भारताने खो खो विश्वचषक 2025चा पहिला सामना जिंकला.

प्रदीप वायकरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आता ग्रुप ‘अ’ मधील आपला पुढचा म्हणजेच दुसरा सामना आज मंगळवार (14 जानेवारी) रोजी ब्राझीलसोबत खेळेल. पहिल्या सामन्यातील विजयाने सर्व भारतीय खेळाडूंचे मनोबल उंचावली आहेत. स्पर्धेत प्रत्येकी 5 संघांचे एकूण 4 गट तयार करण्यात आले आहेत. ज्यामध्ये फक्त अव्वल 2 संघच उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करू शकतील.

हेही वाचा-

IPL 2025 UPDATE; पहिल्या आणि अंतिम सामन्याचे ठिकाण ठरले, या मैदानावर रंगणार प्लेऑफ्सचा थरार
खराब फाॅर्ममधून जाणारा रोहित शर्मा रणजी ट्रॉफीमध्ये परतणार, चक्क इतक्या वर्षांनी स्पर्धेत खेळणार
‘या’ 3 भारतीय खेळाडूंनी चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये केले सर्वाधिक वेळा नेतृत्व

Comments are closed.