‘सूर्यकुमार यादव मला सतत मेसेज करायचा…’, बोल्डनेससाठी ओळखल्या जाणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रीचा गौप्यस्फोट

सोशल मीडियावर कायम चर्चेत असलेली अभिनेत्री आणि मॉडेल खुशी मुखर्जीने पुन्हा एकदा प्रेक्षकांचा लक्ष वेधले आहे. बोल्ड फॅशन आणि आगळावेगळ्या आउटफिट्समुळे ती नेहमीच ट्रेंडिंगमध्ये राहते. मात्र, अलीकडेच तिच्या एका वक्तव्यामुळे क्रिकेट फॅन्स आणि सोशल मीडिया युजर्समध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

खुशीने दिलेल्या मुलाखतीत टीम इंडियाचा टी20 कर्णधार सूर्यकुमार यादव बाबत स्पष्ट केले की, अनेक क्रिकेटपटू पूर्वी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. विशेष म्हणजे, सूर्यकुमार यादवही तिला पूर्वी खूप मेसेज करत असे. तरीही, खुशीनं स्पष्ट सांगितलं की, आता त्यांच्यात जास्त संवाद नाही आणि ती कोणत्याही लिंक-अप किंवा अफवांमध्ये सहभागी होऊ इच्छित नाही.

खुशी मुखर्जी म्हणाली, “कित्येक क्रिकेटर्स माझ्या मागे लागले होते. सूर्यकुमार यादवही मला खूप मेसेज करायचा, पण आता आमचं जास्त बोलणं होत नाही. मला माझं नाव त्याच्याशी जोडलेलं नकोय.”

खुशी मुखर्जी ही फक्त साऊथ चित्रपटच नव्हे, तर रिअॅलिटी शो आणि बोल्ड वेब सिरीजमधूनही प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर आहे. 24 नोव्हेंबर 1996 रोजी कोलकात्यात जन्मलेल्या खुशीनं 2013 मध्ये तमिळ चित्रपट अंजली थुराई मार्फत अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिने डोंगा प्रेमा, हार्ट अटॅक सारख्या तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आणि हिंदी चित्रपट श्रृंगार मध्येही दिसली. भारतीय टेलिव्हिजन आणि रिअॅलिटी शोमुळे तिला मोठा ब्रेक मिळाला.

सोशल मीडिया आणि फॅन्सच्या चर्चेत तिला कायम ठेवणारे तिचे बोल्ड वक्तव्य, अभिनय कारकीर्द आणि आऊटफिट्स, या सर्व गोष्टींसह ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Comments are closed.