कुणी तरी येणार गं! सिद्धार्थ-कियाराच्या घरी गुड न्यूज, खास फोटो शेअर करत दिली माहिती

बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची जोडी बॉलीवूडच्या मोस्ट फेव्हरेट कपलपैकी एक आहे. हे दोघेही 7 फेब्रुवारी, 2023 रोजी विवाह बंधनात अडकले होते. आता त्यांच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण झाले असून लवकरच ते आई बाबा होणार आहेत. यासंदर्भात त्यांनी स्वत: सोशल मीडियावर माहिती दिली आहे.

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये दोघांच्याही हातात लहान बाळाचे मोजे आहेत. हा फोटो शेअर करताना The greatest gift of our lives…
Coming soon असे कॅप्शन लिहिले आहे. सिद्धार्थ आणि कियारा यांनी शेअर केलेल्या या फोटोवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

7 फेब्रुवारी 2023 मध्ये राजस्थानमध्ये या दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडला होता. आता लग्नाच्या दोन वर्षांनी दोघांनी चाहत्यांना गूड न्यूज दिली आहे.

Comments are closed.