श्रीकांतचे सुवर्णस्वप्न पुन्हा भंग, यूएस ओपनच्या अंतिम फेरीत सु ली-यांगकडून पराभव

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थानचा स्टार खेळाडू  किदांबी श्रीकांत याचे तब्बल नऊ वर्षांनंतर बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूरचे विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. यूएस ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चीन तैपईच्या सु ली-यांगने श्रीकांतचा 15-21, 21-16, 21-9 असा पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले.

33 वर्षीय श्रीकांतने स्वतःपेक्षा नऊ वर्षांनी लहान असलेल्या सु ली-यांगविरुद्ध झुंजार लढत दिली. पहिला गेम गमावल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये दमदार पुनरागमन करत सामना बरोबरीत आणला. मात्र, तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये थकव्याचा परिणाम स्पष्ट दिसून आला. तब्बल एक तास नऊ मिनिटे रंगलेल्या या संघर्षात सु ली-यांगने अखेर निर्णायक बाजी मारली.

su घेतलायांगचा एकहाती वर्चस्व

सामन्याच्या पहिल्या गेममध्ये सु ली-यांगने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत 10-5 अशी आघाडी घेतली. श्रीकांतने शानदार पुनरागमन करत 10-10 अशी बरोबरी साधली, पण त्यानंतर सलग सात गुणांची कमाई करत सु ली-यांगने 21-15 ने पहिला गेम खिशात घातला. दुसऱ्या गेममध्ये श्रीकांतने जबरदस्त प्रतिकार केला. मात्र अखेरीस सलग गुणांची कमाई करत श्रीकांतने 21-16 असा गेम जिंकत सामन्यात बरोबरी साधली. मात्र, पुढे श्रीकांतची गती मंदावली आणि सु ली-यांगने त्याचा पुरेपूर फायदा घेत 21-9 गुणंसह विजेतेपद पटकावले.

Comments are closed.