हुकूमशहा किम जोंगने मुलीला केले उत्तराधिकारी
उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन याने मुलगी किम जू-ए हिची आपला उत्तराधिकारी म्हणून निवड केली आहे. दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेने हा दावा करत म्हटलंय की, किम जोंग उन याने आपली मुलगी तिला सध्या भविष्यातील सर्वोच्च नेत्या म्हणून विशेष प्रशिक्षण दिले जात असून सरकारी कार्यक्रमांमधील तिची वाढती उपस्थिती याचेच संकेत देत असल्याचे सांगण्यात आले आहे.
किम जू-ए ही किम जोंग उन याच्यासोबत अनेकदा आंतरखंडीय क्षेपणास्त्र चाचण्या आणि लष्करी संचलनांमध्ये आघाडीवर दिसून आली आहे. किम जोंग उन याच्या प्रपृतीबाबत सातत्याने उलटसुलट चर्चा असतात. त्याचे वाढलेले वजन आणि धूम्रपानाच्या सवयीमुळे उद्भवणाऱया संभाव्य आरोग्य समस्या लक्षात घेता, त्याने आतापासूनच सत्तेच्या संक्रमणाची तयारी सुरू केल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.
Comments are closed.