किम जोंग यांना बेलारुस राष्ट्रपतींकडून रायफल भेट

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बेलारुसचे राष्ट्रपती अलेक्झांडर लुकाशेंको यांनी उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांना ऑटोमॅटिक रायफल भेट दिली आहे. ही भेट देताना लुकाशेंको यांनी गंमत करताना म्हटले की, ही रायफल तुम्हाला भेट म्हणून देत आहे. जर कोणताही शत्रू दिसला तर तुम्हाला ती उपयोगी पडेल. या दोन्ही देशांनी युक्रेनविरोधात युद्धात रशियाची मदत केली आहे. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत दिसत आहे की, किम जोंग यांना रायफल देताना लुकाशेंको यांच्या चेहऱयावर हास्य उमटले आहे. ही रायफल बेलारुसमध्ये बनवण्यात आली असून ती आधुनिक आहे. किम जोंग यांनीही या भेटीचा स्वीकार करत आनंद व्यक्त केला आहे.

Comments are closed.