कीर्ती आझाद यांच्यावर ई-सिगारेट ओढल्याचा आरोप आहे.
भाजपने केला व्हिडिओ शेअर
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
गेल्या शुक्रवारी भारतीय जनता पक्षाचे खासदार अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत एका खासदाराने कथितपणे ई-सिगारेट ओढल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. यासंबंधी त्यांनी सभापती ओम बिर्ला यांच्याकडे लेखी तक्रार देखील सादर करतानाच तृणमूल काँग्रेसच्या खासदारावर कारवाईची मागणी केली. आता, भाजप मीडिया सेलचे प्रभारी अमित मालवीय यांनी तृणमूल काँग्रेसचे खासदार कीर्ती आझाद यांचा एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी सभागृहात ई-सिगारेट ओढल्याचा आरोप केला आहे.
भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी संसदेत ई-सिगारेट ओढल्याचा आरोप केलेली व्यक्ती म्हणजे तृणमूल काँग्रेसचे खासदार कीर्ती आझाद हे नाव असल्याची माहिती अमित मालवीय यांनी व्हायरल केली. आझाद यांच्यासारख्यांसाठी नियम आणि कायद्यांचा काही अर्थ नाही. सभागृहात ई-सिगारेट लपवून ठेवणे किती उद्धटपणाचे आहे याची कल्पना करा. संसदेत त्याचा वापर पूर्णपणे अस्वीकार्य आहे. ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या खासदाराने केलेल्या या गैरवर्तनाचे स्पष्टीकरण द्यावे, असेही ते पुढे म्हणाले.
Comments are closed.