मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी किशोरी पेडणेकर यांची निवड
मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची अधिकृत निवड करण्यात आली आहे. पालिकेतील प्रदीर्घ अनुभव आणि जनसामान्यांशी असलेली नाळ लक्षात घेऊन पक्षाच्या वतीने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
मुंबईच्या महापौर म्हणून काम करताना किशोरी पेडणेकर यांनी प्रशासनावर आपली पकड निर्माण केली होती. आता विरोधी पक्षनेते म्हणून त्या पालिकेतील जनहिताच्या प्रश्नांवर काम करणार आहेत. दरम्यान, ६५ जागांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष पालिकेतील सर्वात मोठा विरोधी पक्ष ठरला आहे.
Comments are closed.