Kitchen Sponge: भांडी धुण्याचा स्पंज किती दिवसांनी बदलावा?
भांडी स्वच्छ करण्यासाठी वापरला जाणारा स्पंज दिसायला स्वच्छ असला तरी तो स्वयंपाकघरातील सर्वाधिक जंतू असणाऱ्या वस्तूंमध्ये मोजला जातो. ओलसर वातावरण, अन्नाचे सूक्ष्म कण आणि सततचा वापर यामुळे स्पंजमध्ये बॅक्टेरिया वेगाने वाढू शकतात. त्यामुळे तो कितदिवसांनी बदलावा, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
भांडी धुण्याचा स्पंज दर 2 ते 3 आठवड्यांनी बदलणे आरोग्यासाठी सुरक्षित मानले जाते. जरी तो दिसायला नवीन वाटत असला, तरी सततच्या ओलाव्यामुळे त्यात बॅक्टेरिया वाढतात जे आपल्यासाठी अतिशय हानिकारक मानले जातात. जर त्यातून दुर्गंधी येत असेल, रंग बदलला असेल किंवा तो तुटू लागला असेल, तर वाट पाहण्यापेक्षा लगेच नवीन स्पंज वापरणं योग्य ठरेल.
ही खबरदारी घ्यावी
स्पंज अधिक काळ स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक वापरानंतर तो चांगला धुऊन पूर्णपणे पिळावा. शक्य असल्यास हवेशीर ठिकाणी वाळू द्यावा. आठवड्यातून एकदा गरम पाण्यात धुणे किंवा निर्जंतुक करण्याची पद्धत वापरल्यास जंतूंची संख्या कमी होण्यास मदत होऊ शकते. त्याचबरोबर, भाजी धुणे, भांडी घासणे आणि स्वयंपाकघराचा ओटा पुसणे यासाठी एकच स्पंज वापरणे टाळावे. प्रत्येक कामासाठी वेगळा स्पंज ठेवल्यास क्रॉस-कंटॅमिनेशनचा धोका कमी होतो.
स्वयंपाकघर स्वच्छ ठेवण्याचा अर्थ फक्त भांडी चमकवणे नाही, तर वापरल्या जाणाऱ्या [प्रत्येक वस्तू वेळेवर बदलणेही तितकेच महत्त्वाचे आहे. भांडी धुण्याचा स्पंज वेळेवर बदलल्याने बॅक्टेरियापासून बचाव होऊन आरोग्याचे संरक्षण होऊ शकते.
Comments are closed.