DC vs KKR: रघुवंशीची शानदार खेळी! केकेआरने दिल्लीसमोर उभारला 205 धावांचा डोंगर
आयपीएल 2025 मध्ये 48व्या सामना आज (29 एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स (DC vs KKR) संघात खेळला जात आहे. दोन्ही संघ दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर आमने-सामने आहेत. या सामन्यात अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील दिल्लीने टाॅस जिंकून केकेआरला फलंदाजासाठी पाचारण केलं होतं. दरम्यान केकेआरने मर्यादित 20 षटकात 204 धावा केल्या आहेत.
केकेआरसाठी प्रथम फलंदाजी करताना रहमाननल्लाह गुरबाज आणि सुनील नरेन यांनी सलामी दिली. दोन्ही फलंदाजांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली. दोन्ही फलंदाज अनुक्रमे 26 आणि 27 अशा धावसंख्येवर बाद झाले. त्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे 26 धावांची खेळी केली. तर युवा खेळाडू अंगक्रिश रघुवंशीने केकेआरसाठी सर्वाधिक 44 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 3 चौकारांसह 2 षटकार मारले. रिंकू सिंग 36, आंद्रे रसल 17 धावा यांच्या जोरावर केकेआर संघ 204 धावांचा डोंगर उभारण्यात यशस्वी ठरला.
दिल्लीसाठी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने (Mitchell Starc) 4 षटकांत 43 धावा देऊन 3 विकेट्स आपल्या नावावर केल्या. तर अष्टपैलू खेळाडू कर्णधार अक्षर पटेल आणि विपराज निगम यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. दुष्मंथा चमीरा 1 विकेट घेण्यात यशस्वी ठरला. आता दिल्लीचा संघ 205 धावा करण्यात यशस्वी ठरतो का? हे पाहणे उत्सुकतेचं ठरेल.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11-
दिल्ली कॅपिटल्स- फाफ डु प्लेसिस, अभिषेक पोरेल (यशरक्षक), करुन नायर, केएल राहुल, अक्षर पटेल (कर्नाधर), ट्रिस्टन स्टॅब्स, विप्रज निगम, मिशेल स्टार्क, कुलदीप यादव, दुश्मण्था चामेरा, मुखुर
कोलकाता नाईट रायडर्स- रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे(कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, रोवमन पॉवेल, हर्षित राणा, अनुकुल रॉय, वरुण चक्रवर्ती
Comments are closed.