कोलकाता नाईट रायडर्स 40.65 कोटींचे 6 खेळाडू रिलीज करणार? आगामी हंगामापूर्वी संघात होणार मोठे फेरबदल!

आयपीएल 2024 (IPL 2024) जिंकलेल्या कोलकाता नाईट रायडर्ससाठी आयपीएल 2025 हा निराशाजनक हंगाम ठरला. संघाचा खेळ चांगला झाला नाही आणि KKR प्लेऑफमध्ये पोहोचूही शकली नाही. आता आगामी सीझनपूर्वी KKR 6 स्टार खेळाडूंना रिलीज करण्याच्या तयारीत आहे. या खेळाडूंची एकूण पगाररक्कम 40.65 कोटी रुपये आहे.

नवीन हंगामपूर्वी KKR मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. असे बोलले जात आहे की, फ्रँचायझी 23.75 कोटींमध्ये घेतलेल्या वेंकटेश अय्यरला (Venkatesh Iyer) रिलीज करणार आहे. त्याचबरोबर 6.5 कोटींचे एनरिक नॉर्खिया, 3.60 कोटींचे क्विंटन डी कॉक, आणि 2.80 कोटींचे स्पेन्सर जॉन्सन यांनाही टीममधून बाहेर करण्याची योजना आहे.

तसेच 2 कोटींचे रहमानुल्लाह गुरबाज आणि 2 कोटींचे मोईन अली यांनाही KKR रिलीज करणार आहे. या 6 खेळाडूंचा IPL 2025 मधील पगार मिळून 40.65 कोटी रुपये होता.

IPL 2024 मध्ये श्रेयस अय्यरच्या (Shreyas iyer) कर्णधारपदाखाली KKR ने विजेतेपद पटकावले होते. पण त्यानंतर त्याला टीमने रिलीज केले. मग IPL 2025 साठी फ्रँचायझीने अजिंक्य रहाणेला टीममध्ये घेतले आणि त्याच्याकडे कर्णधारपद सोपवले. श्रेयस अय्यरला मात्र पंजाब किंग्सने घेतले आणि त्यांना कॅप्टन बनवले.

याआधी KKR ने गौतम गंभीर यांच्या नेतृत्वाखाली 2012 आणि 2014 मध्ये दोन वेळा IPL जिंकले आहे. आता IPL 2026 मध्ये चौथे विजेतेपद मिळवण्याच्या उद्देशाने KKR मैदानात उतरणार आहे.
आगामी हंगामात KKR कोणत्या नवीन टीम कॉम्बिनेशनसह उतरते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Comments are closed.