आयपीएल इतिहासातील 5 सर्वात धाकड खेळाडू रिलीज, 12 वर्षांनंतर KKR चा स्टार खेळाडूला निरोप
आईपीएल 2026 च्या ऑक्शनपूर्वी सर्व टीम्सची रिटेन्शन लिस्ट जाहीर झाली आहे. चेन्नई सुपर किंग्सने (CSK) एकूण 12 खेळाडूंना रिलीज केले आहे. त्याचबरोबर काही मोठे खेळाडू ट्रेडही झाले आहेत. मोहम्मद शमी आणि सनराइजर्स हैदराबादच्या मार्ग वेगळे झाले आहेत आणि पुढच्या हंगामात तो लखनऊ सुपर जायंट्ससाठी (LSG) खेळताना दिसेल. तर शार्दुल ठाकुर (Shardul Thakur) मुंबई इंडियन्समध्ये परत आला आहे. मात्र, काही टीम्सने चक्कीत टाकणारे निर्णय घेतले आणि त्यांच्या महत्वाच्या खेळाडूंना रिलीज केले आहे.
आंद्रे रसेल
कोलकाता नाइट रायडर्सने त्यांच्या रिटेन्शन लिस्टमध्ये सगळ्यांना आश्चर्यचकित केले. KKR ने आंद्रे रसेलला (Andre Russell) रिलीज केले. रसेल मागील 12 वर्षांपासून कोलकातासोबत होता आणि सगळ्यांना अपेक्षा होती की, यावेळीही टीम त्याला रिटेन करेल. मात्र, KKR ने या कॅरेबियन स्टारसोबत आपले मार्ग वेगळे केले आहेत.
व्यंकटेश अय्यर
KKR ने मागील ऑक्शनमध्ये वेंकटेश अय्यरला (Venkatesh Iyer) मिळवण्यासाठी मोठा पैसा खर्च केला होता. 23.75 कोटी रुपये खर्च करून त्याला टीममध्ये सामील केले. मात्र, यावेळी ऑक्शनपूर्वीच वेंकटेशला रिलीज केले गेले. मागील सिझनमध्ये त्याचं प्रदर्शन काही खास चांगलं नव्हतं आणि तो धावांसाठी संघर्ष करताना दिसला होता.
मठीशा पाथीराणा
चेन्नई सुपर किंग्सकडून सर्वांना अपेक्षा होती की, मथीशा पथिराना (Matheesha pathirana) रिटेन केले जाईल. मागील दोन हंगामात त्याचं प्रदर्शन उत्कृष्ट राहिलं होतं. तरीही, CSK ने ‘बेबी मलिंगा’ला रिटेन केले नाही.
ग्लेन मॅक्सवेल
7 सामन्यांत 48 धावा केलेल्या ग्लेन मॅक्सवेलला (Glenn Maxwell) पंजाब किंग्सने रिलीज केले आहे. मॅक्सवेलचं प्रदर्शन 2024 सिझनमध्येही काही खास चांगलं नव्हतं आणि दोन सिझन्समध्ये तो फ्लॉप ठरला. म्हणूनच पंजाबने त्याच्याशी आपले मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेतला.
डेव्हिड मिलर
आईपीएलमध्ये विस्फोटक फलंदाजीने अनेक सामन्यांत विजय मिळवून दिलेल्या डेव्हिड मिलरला (david Miller) लखनऊ सुपर जायंट्सने रिलीज केले आहे. IPL 2025 मध्ये मिलरने LSGसाठी 11 सामने खेळले आणि त्याच्या बॅटने 127 च्या स्ट्राइक रेटने 153 धावा केल्या.
Comments are closed.