कोलकाता संघ अडकला पराभवाच्या विळख्यात, ब्रावोने उघड केले कारण!

21 एप्रिल रोजी आयपीएल 2025 मध्ये कोलकाता संघाला त्यांच्याच घरेलू मैदानात म्हणजेच ईडन गार्डनवर गुजरात कडून जोरदार पराभवाचा सामना करावा लागला. हंगामात पाचव्या पराभवानंतर केकेआरचे मेंटोर ड्वेन ब्रावोने स्वीकार केले आहे की, संघाच्या फलंदाजांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता आहे. त्यांनी संघाच्या कमजोरीबद्दल खुलासा केला आहे. गुजरातने ईडन गार्डन्सवर कोलकाताचा 39 धावांनी पराभव केला. त्यानंतर ब्रावोने या पराभवाला कारणीभूत खेळपट्टीला ठरवले नाही.

ब्रावोने सामन्यानंतर म्हटले, आयपीएल एक मोठी स्पर्धा आहे आणि जेव्हा तुम्ही चांगली सुरुवात करत नाही तेव्हा तुम्हाला माहिती आहे की, फलंदाजांमध्ये आत्मविश्वासाची कमी निर्माण होते. तेच आता आमच्या संघासोबत होत आहे. त्यामुळेच आता मला त्यांचे समर्थन करावे लागेल आणि आशा आहे की, पुढे ते चांगले प्रदर्शन करतील. आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे ते चांगल्या धावा करू शकत नाही.

ब्रावोने पुढे म्हटले, चांगल्या खेळीमुळे तुमच्यात आत्मविश्वास येतो. इमानदारीने बोलायचे झाल्यास, सध्या आमच्या संघाकडे आत्मविश्वास नाही. तसेच त्यांनी खेळपट्टीला दोषी ठरवले नाही.

ब्रावोने पराभव मान्य केला आणि खेळपट्टी बद्दल म्हटले, खेळपट्टीमध्ये कोणतीही गडबड नाही. मी येथे खेळपट्टी बद्दल बोलायला नाही आलो. मला वाटते की, दोन्ही संघ एकाच खेळपट्टीवर खेळतात. आम्ही चांगले क्रिकेट नाही खेळलो त्यांनी आमच्यापेक्षा चांगला खेळ दाखवला.

Comments are closed.