शाहरुख खानची टीम पहिल्या विजयाच्या शोधात, प्रीती झिंटाच्या ‘किंग्स’शी सामना, कोण जिंकणार?
KKR vs PBKS लाइव्ह स्कोअर IPL 2026 अपडेट मराठीत: आयपीएल 2026 मध्ये प्रत्येक सामन्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये मोठे बदल पाहायला मिळत आहेत. आज पंजाब किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात रंगतदार सामना होणार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाब आज विजयाची हॅट्रिक साधत टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावण्याच्या प्रयत्नात असेल, तर केकेआर अजूनही आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात आहे.
पंजाब किंग्सने आतापर्यंत खेळलेल्या 2 सामन्यांत गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांसारख्या माजी विजेत्या संघांना पराभूत करून दमदार सुरुवात केली आहे. दुसरीकडे, केकेआरची अवस्था चिंताजनक आहे. त्यांना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबादकडून मोठे पराभव पत्करावे लागले आहेत.
KKR vs PBKS Live Score IPL 2026 : हेड-टू-हेड आकडेवारी
आयपीएल इतिहासात केकेआर आणि पंजाब यांच्यात एकूण 35 सामने झाले आहेत. त्यापैकी केकेआरने 21 वेळा विजय मिळवला आहे, तर पंजाबला फक्त 13 वेळा यश मिळाले आहे. एक सामना निकालाशिवाय राहिला आहे. त्यामुळे आकडेवारीत कोलकात्याचा स्पष्ट वरचष्मा दिसून येतो.
KKR वि PBKS लाइव्ह स्कोअर IPL 2026: ईडन गार्डन्सवर रेकॉर्ड
आजचा सामना ईडन गार्डन्स येथे खेळवला जाणार आहे. या मैदानावर पंजाबचा रेकॉर्ड फारच खराब आहे. येथे दोन्ही संघांमध्ये 14 सामने झाले असून केकेआरने 9 वेळा विजय मिळवला आहे, तर पंजाब फक्त 4 वेळा जिंकू शकला आहे. एक सामना पावसामुळे रद्द झाला होता.
KKR वि PBKS लाइव्ह स्कोअर IPL 2026: खेळपट्टीचा अहवाल
ईडन गार्डन्सची पिच ही विशेषतः फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. T20 सामन्यांत येथे मोठे स्कोअर सहज उभे राहतात आणि चेस करणेही तुलनेने सोपे असते. त्यामुळे आज टॉस जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
KKR vs PBKS Live Score IPL 2026 : कोण बाजी मारणार?
सध्याच्या फॉर्मनुसार पंजाब किंग्सचा आत्मविश्वास उंचावलेला आहे, तर केकेआरवर विजयाचे दडपण आहे. मात्र, घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा केकेआरला मिळू शकतो. त्यामुळे हा सामना शेवटपर्यंत रंगतदार होणार यात शंका नाही.
KKR वि PBKS लाइव्ह स्कोअर IPL 2026 : कोलकाता नाईट रायडर्सचा संघ- (IPL 2026 KKR Full Squad)
अजिंक्य रहाणे, अंगकृष्ण रघुवंशी, अनुकुल रॉय, हर्षित राणा, मनीष पांडे, रमणदीप सिंग, रिंकू सिंग, रोवमन पॉवेल, सुनील नरेन, उमरान मलिक, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, कॅमेरॉन ग्रीन, फिन एलन, मथिशा पाथिराना, राहुल सिंग, तेजस्वी सिंह, कार्तिक त्यागी, प्रशांत सोलंकी, राहुल त्रिपाठी, टिम सीफर्ट, ब्लेसिंग मुझारबानी, सार्थक रंजन, दक्ष कामरा, रचिन रवींद्र, आकाश दीप
KKR वि PBKS लाइव्ह स्कोअर IPL 2026 : पंजाब किंग्सचा संघ-(IPL 2026 PBKS पूर्ण संघ)
प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर (कर्ंधर), शशांक सिंग, नेहल वढेरा, मार्कस स्टोइनिस, अजमतुल्ला ओमरझाई, मार्को जॅनसेन, हरप्रीत ब्रार, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मुशीर खान, प्याला अविनाश, हरनूर पन्नू, सूर्यनूर, बार्टचे, लोअर शेर, ओमशेर, लोअर शेर फर्ग्युसन, विजयकुमार. वैशाक, यश ठाकूर, विष्णू विनोद, कूपर कोनोली, बेन द्वारशुईस, प्रवीण दुबे, विशाल निषाद
हे ही वाचा –
Comments are closed.