KKR vs RCB: केकेआर प्लेऑफच्या रेसमधून बाहेर होणार? जाणून घ्या मोठे कारण समोर
आयपीएल 2025 उर्वरित स्पर्धा (17 मे) पासून सुरू होत आहे. तसेच स्पर्धेतील 58वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू आणि गतविजेता संघ कोलकाता नाईट रायडर्स (RCB vs KKR) दोन्ही संघांमध्ये संध्याकाळी 7.30 वाजता बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
पॉईंट्स टेबलवर आरसीबी (RCB) दुसऱ्या तर केकेआर (KKR) सहाव्या स्थानावर आहे. आरसीबी केकेआरचा पराभव करून प्लेऑफमध्ये जाण्याचा प्रयत्न करेल, तसेच केकेआर सामना जिंकून प्लेऑफच्या रेसमध्ये टिकण्याचा प्रयत्न करेल. पण केकेआर संघावर प्लेऑफ मधून बाहेर पडण्याचे सावट आहे.
या सामन्यावर पावसाचे सावट आहे. गुरुवार (15 मे) रोजी बंगळूरुमध्ये खूप पाऊस झाला आहे. तसेच हवामान खात्याच्या रिपोर्टनुसार सामन्यादिवशी सुद्धा बंगळूरुत पाऊस पडण्याची शक्यता आहे. जर पावसामुळे सामना रद्द झाला तर, दोन्ही संघांना एक-एक पॉईंट्स मिळेल. त्याचप्रमाणे जर 1 पॉईंट मिळाला तर आरसीबी प्लेऑफसाठी पात्र होईल. तसेच केकेआर प्लेऑफच्या रेस मधून बाहेर पडेल. त्यामुळे एका गुणाने केकेआरच्या अडचणी थांबणार नाहीत. जर प्लेऑफच्या रेसमध्ये टिकून राहायचे असेल, तर केकेआरला सामना जिंकून दोन पॉईंट्स मिळवावेच लागतील.
कोलकाताने आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 5 सामन्यात त्यांना विजय मिळाला आहे. तसेच 6 सामन्यात त्यांनी पराभव पत्करला आहे. त्यांचा एक सामना रद्द झाला होता, त्यामुळे सध्या त्यांचे 13 गुण आहेत.
भारत- पाकिस्तान संघर्षामुळे बीसीसीआयने आयपीएल 2025 स्पर्धा एका आठवड्यासाठी स्थगित केली होती. त्यानंतर आता 17 मे पासून स्पर्धा पुन्हा सुरू होत आहे. स्पर्धा स्थगित झाल्यामुळे अंतिम सामन्याची तारीख देखील बदलली आहे. आता अंतिम सामना 25 मे रोजी नाही तर 3 जून रोजी खेळला जाणार आहे. प्लेऑफची सुरुवात 29 मे पासून होणार आहे. त्याच्या ठिकाणांची घोषणा अजूनही करण्यात आली नाही.
Comments are closed.