प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर KKRचं मोठं पाऊल, ‘या’ फिरकीपटूला संघात केलं सामील!

17 मे रोजी कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सामना आरसीबी विरुद्ध एम चिन्नास्वामी मैदानावर होणार होता. पण पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला आणि दोन्ही संघांना एक-एक गुण देण्यात आला. प्लेऑफच्या रेसमध्ये टिकून राहण्यासाठी केकेआरला आरसीबी विरुद्धचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकायचाच होता. पण सामना रद्द झाल्याने केकेआर संघाचा या हंगामातील प्लेऑफच्या आशा तिथेच संपल्या. आता प्लेऑफच्या रेस मधून बाहेर पडल्यानंतर केकेआरने त्यांच्या संघात एका फिरकीपटूला सामील केले आहे.

कोलकाताने राहिलेल्या त्यांच्या एका सामन्यासाठी मध्यप्रदेशच्या फिरकीपटू शिवम शुक्लाला त्यांच्या संघात स्थान दिले आहे. तो संघामध्ये रोवमैन पॉवेलची जागा घेईल. रोवमैन भारतात परतला नसल्यामुळे फ्रेंचाईजीने शिवमला खेळण्यासाठी त्यांचा संघात सामील केले आहे. 18 मे रोजी केकेआरने या रिप्लेसमेंटचा खुलासा केला आहे.

29 वर्षाच्या शुक्लाने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा फक्त एक हंगाम खेळला आहे. या स्पर्धेत त्याने काही सामन्यात चांगले प्रदर्शन केल आणि एकूण 8 विकेट्स घेतल्या. यामध्ये बंगाल विरुद्ध त्याने 4 विकेट्स घेऊन 29 धावा देण्याची कामगिरी केली होती.

याशिवाय शुक्लाने मध्य प्रदेश प्रीमियर लीगच्या मागच्या हंगामात सुद्धा शानदार प्रदर्शन केले होते. त्या स्पर्धेत तो सर्वात जास्त विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. त्याने एकूण 10 विकेट घेतल्या, ज्यामध्ये एका सामन्यात त्याने 5 फलंदाजांना बाद केले. कोलकाता त्याला पुढच्या सामन्यांसाठी संधी देईल किंवा नाही हे येणाऱ्या काळात समजेलच. केकेआर त्यांचा शेवटचा सामना हैदराबाद विरुद्ध 25 मे रोजी खेळणार आहे.

Comments are closed.