रोहित-कोहलीची लवकर एक्झिट, पण संकटमोचक KL राहुलचं शतक अन् चित्र पालटलं, न्यूझीलंडसमोर तगडे आव्ह

केएल राहुलचे शतक भारत विरुद्ध न्यूझीलंड राजकोट वनडे : राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात केएल राहुलने अप्रतिम शतकी खेळी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. विराट कोहली, रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर अपयशी ठरल्यानंतर राहुलने जबाबदारी खांद्यावर घेत संघाला सावरलं. हे केएल राहुलचं एकदिवसीय क्रिकेटमधील आठवं शतक ठरलं. त्याने अवघ्या 87 चेंडूत शतक पूर्ण केलं, ज्यामुळे भारतीय डावाला गती मिळाली. राहुलच्या या दमदार शतकाच्या जोरावरच भारताने 50 षटकांत 284 धावांचा भक्कम स्कोअर उभारला. केएल राहुलने 92 चेंडूत नाबाद 112 धावा केल्या. या खेळीत त्याचा स्ट्राइक रेट 122 होता. आपल्या झंझावाती डावात त्याने 12 चौकार आणि 1 षटकार ठोकत न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवलं.

संकटमोचक केएल राहुलचम शतक एक चित्र पलटलम (केएल राहुल शतक भारत विरुद्ध न्यूझीलंड)

भारताचे चार फलंदाज 118 धावांवर बाद झाले. राहुल पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आणि त्याने डावाची सूत्रे हाती घेतली. त्याने रवींद्र जडेजासोबत 88 चेंडूत 73 धावांची भागीदारी केली. त्यानंतर त्याने नितीश रेड्डीसोबत 49 चेंडूत 57 धावा केल्या. राहुल सुरुवातीला आरामात होता, पण शेवटच्या षटकांमध्ये त्याने जलद धावा केल्या. राहुल व्यतिरिक्त, कर्णधार शुभमन गिलनेही 56 धावा केल्या.

राहुलची न्यूझीलंडविरुद्धची आकडेवारी

राहुलने 2019 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला. त्याने 10 सामने खेळले आहेत आणि 10 डावांमध्ये 85 पेक्षा जास्त सरासरीने 430 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याने दोन शतके आणि एक अर्धशतक झळकावले आहे. राहुलने ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाविरुद्ध त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत सर्वाधिक धावा (782) केल्या आहेत. न्यूझीलंड दुसऱ्या क्रमांकावर आहे. राहुलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सात अर्धशतके झळकावली आहेत.

हे ही वाचा –

Virat Kohli IND vs NZ : सचिनचा विक्रम मोडताच विराटला जबरदस्त ‘धक्का’! इतिहासाच्या उंबरठ्यावरच स्वप्न भंग, नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.