शतक ठोकताच राहुलची सचिन, विराटच्या विशेष लिस्टमध्ये एंट्री
भारताचा विकेटकिपर-फलंदाज केएल राहुल याने न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात उल्लेखनीय खेळी करत अनेक विक्रमे केली आहेत. 14 जानेवारीला झालेल्या या राजकोट सामन्यात त्याने त्याचे वनडेतील आठवे शतक झळकावले आहे. याचबरोबर तो 2026 वर्षात भारताकडून पहिले शतक करणारा खेळाडू ठरला आहे. या सामन्यात त्याने 92 चेंडूत नाबाद 112 धावा केल्या.
या सामन्यात भारताची स्थिती 118 धावसंख्येवर 4 विकेट्स अशी असताना राहुलने पाचव्या क्रमांकावर चिकाटीने फलंदाजी केली. त्याने शतकी खेळी करता तो सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्या विशिष्ठ यादीत जाऊन बसला आहे. तो घरच्या मैदानावर न्यूझीलंड विरुद्ध वनडेत शतक ठोकणारा केवळ सहावाच भारतीय खेळाटू ठरला आहे. असा पराक्रम सचिन, विराटबरोबर राहुल द्रविड, विरेंद्र सेहवाग आणि श्रेयस अय्यर यांनीही केला आहे. त्याचबरोबर राहुलचे हे विकेटकीपर म्हणून तिसरे वनडे शतक ठरले आहे. भारताकडून वनडेमध्ये सर्वाधिक शतकी खेळी करणाऱ्याच्या यादीत एमएस धोनी 9 शतकासह पहिल्या आणि द्रविड 4 शतकासह दुसऱ्या स्थानी आहे.
त्तपूर्वी या सामन्यात कर्णधार शुबमन गिल आणि रोहित शर्मा यांनी संघाला दमदार सुरूवात करून दिली होती. त्यांनी पहिल्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली. गिलने अर्धशतक पूर्ण केले, तर रोहित 24 धावा करत बाद झाला. त्याच्यानंतर आलेले विराट आणि अय्यरही काही खास करू शकले नाही. अय्यर तर 8 धावा करत विकेट गमावून बसला. यामुळे भारत विकेट न गमावता समाधानकारक धावसंख्या उभारेल की नाही ही चिंता होती. अशावेळी संघाच्या मदतीला राहुल धावून आला.
राहुलने रविंद्र जडेजा आणि नितीश कुमार रेड्डी या दोघांसोबत अर्धशतकी भागीदारी केली. ज्यामुळे संघाला 50 षटकात 7 विकेट्स गमावत 284 धावसख्या उभारता आली. विशेष म्हणजे राजकोटमध्ये झालेल्या विजयी सामन्यातही राहुलनेच मोठी खेळी केली होती.
Comments are closed.