GT vs DC: केएल राहुलने रचला इतिहास..! शतक झळकावत 'या' स्टार खेळाडूंना टाकलं मागे
यंदाच्या आयपीएल हंगामातील 60वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध गुजरात टायटन्स (DC vs GT) संघात खेळला गेला. हा सामना दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर रंगला होता. या सामन्यात दिल्लीचा सलामीवीर केएल राहुलने शानदार शतक झळकावत इतिहास रचला. (KL Rahul creates history by scoring a century) या शतकासहित त्याने अनेक रेकाॅर्ड्स आपल्या नावावर केले. त्याने सामन्यात 65 चेंडूत एकूण 112 धावा केल्या, ज्यात 14 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता.
केएल राहुलने (KL Rahul) त्याच्या टी-20 कारकिर्दीतील 7 वे शतक झळकावले आहे. यासह, त्याने भारतासाठी टी-20 क्रिकेटमध्ये शतके झळकावण्याच्या बाबतीत संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, ऋतुराज गायकवाड आणि शुबमन गिल यांना मागे टाकले आहे. या चारही फलंदाजांनी टी-20 क्रिकेटमध्ये एकूण 6 शतके झळकावली आहेत. विराट कोहलीने (Virat Kohli) भारतासाठी टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 9 शतके झळकावली आहेत.
केएल राहुलचे आयपीएलमधील हे पाचवे शतक आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत तो चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. विराट कोहली, जोस बटलर आणि ख्रिस गेल यांनी आयपीएलमध्ये त्याच्यापेक्षा जास्त शतके झळकावली आहेत. आयपीएलमध्ये कोहलीच्या नावावर एकूण 8 शतके आहेत.
केएल राहुल 2013 पासून आयपीएलमध्ये खेळत आहे. आतापर्यंत त्याने 143 आयपीएल सामन्यांमध्ये एकूण 5,176 धावा केल्या आहेत, ज्यात 5 शतके आणि 40 अर्धशतके आहेत. या काळात तो आरसीबी, सनरायझर्स हैदराबाद, पंजाब किंग्ज, लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला आहे.
Ipl आयपीएलच्या इतिहासातील तीन वेगवेगळ्या संघांसाठी शंभर गुण मिळविणारा केएल राहुल पहिला फलंदाज बनला 🚨 pic.twitter.com/w7igqwef9c
– जॉन्स. (@Criccrazyjhons) मे 18, 2025
Comments are closed.