केएल राहुलला कितव्या क्रमांकावर फलंदाजी करायला आवडते? सांगितली मनातली गोष्ट..!

नुकतीच आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी (ICC Champions Trophy 2025) ही स्पर्धा खेळली गेली. या मेगा स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने शानदार कामगिरी करत चॅम्पियन्स ट्राॅफीवर आपले नाव कोरले. दरम्यान संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने देखील या स्पर्धेत चांगली फलंदाजी करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. फलंदाजीच्या क्रमात खालच्या स्थानावर खेळत असूनही केएल राहुल सातत्याने चांगली कामगिरी केली.

केएल राहुल म्हणाला, “मी टॉप ऑर्डरमध्ये खेळत मोठा झालो. वयाच्या 11व्या वर्षी मंगळूरमध्ये खेळलेल्या माझ्या पहिल्या स्पर्धात्मक सामन्यापासून ते भारतासाठी खेळण्याच्या सुरुवातीच्या दिवसांपर्यंत आणि माझ्या कारकिर्दीचा बहुतांश काळ मी टॉप-ऑर्डर फलंदाज राहिलो आहे. ही अशी जागा आहे जिथे मी सर्वात जास्त आरामदायी आहे आणि मला सर्वात नैसर्गिक वाटते.

जिओ हॉटस्टारशी झालेल्या संभाषणादरम्यान तो म्हणाला, “जेव्हा तुम्ही सांघिक खेळ खेळता तेव्हा तुम्हाला नेहमीच काय हवे आहे ते निवडण्याची संधी मिळत नाही. तुम्ही लवचिक असले पाहिजे आणि संघाच्या गरजांशी जुळवून घेण्यास तयार असले पाहिजे. गेल्या काही वर्षांत मी ते स्वीकारायला आणि मला सोपवलेल्या कोणत्याही भूमिकेत माझे सर्वोत्तम देण्यास शिकलो आहे.

पुढे बोलताना तो म्हणाला, “गेल्या 3 आयपीएल हंगामात कर्णधार असल्याने, मी संघ तयार करण्याच्या प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी झालो आहे. संघ तयार करताना फ्रँचायझींना कोणत्या प्रकारच्या दबावाचा सामना करावा लागतो हे मला समजते. पण खेळाडूच्या दृष्टिकोनातून ते आणखी कठीण आहे कारण तुमचे करिअर धोक्यात आहे. पण लिलाव खेळाडूच्या भविष्यातील किंवा वर्तमानातील आव्हानांना आकार देऊ शकतो.”

Comments are closed.