केएल राहुल इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत खेळणार नाही! बीसीसीआयने का घेतला मोठा निर्णय?
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध वनडे आणि टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ लवकरच जाहीर केला जाईल. पण त्याआधीच महत्त्वाची माहिती समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केएल राहुल इंग्लंडविरुद्धच्या मालिकेचा भाग असणार नाही. या मालिकेसाठी राहुलला विश्रांती देण्यात येणार आहे.
केएल राहुलबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी केएल राहुलला विश्रांती देण्यात येईल. त्याच वेळी त्याला आश्वासन देण्यात आलं आहे की, याचा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सिलेक्शनवर कोणताही परिणाम होणार नाही. याचाच अर्थ असा की, राहुल इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत खेळला नाही तरी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघात त्याची निवड होणं जवळजवळ निश्चित आहे.
2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात केएल राहुलची कामगिरी उत्कृष्ट होती. त्यानं संपूर्ण स्पर्धेत आपल्या फलंदाजीनं खूप प्रभावित केलं होतं. परंतु तेव्हापासून त्यानं भारतासाठी खूप कमी एकदिवसीय सामने खेळले आहेत. गेल्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये केएल राहुलनं फक्त 1 एकदिवसीय सामने खेळले. ज्यामध्ये या विकेटकीपर फलंदाजानं 15.50 च्या सरासरीनं 31 धावा केल्या.
केएल राहुलनं 58 कसोटी, 77 एकदिवसीय आणि 72 टी20 सामन्यांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. कसोटीत त्यानं 33.58 च्या सरासरीनं 3257 धावा केल्या. तर एकदिवसीय सामन्यांमध्ये राहुलनं 49.16 च्या सरासरीनं 2851 धावा केल्या आहेत. केएल राहुलनं भारतासाठी 72 टी20 सामन्यांमध्ये 139.13 ची स्ट्राइक रेट आणि 37.75 च्या सरासरीनं 2265 धावा केल्या आहेत.
हेही वाचा –
सुनील गावस्करांची भविष्यवाणी, रोहितनंतर हा खेळाडू होणार भारताचा कर्णधार
जसप्रीत बुमराह या अटीवरच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणार, फिटनेस अपडेट जाणून घ्या
भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक; सामन्याची वेळ, ठिकाण A टू Z जाणून घ्या
Comments are closed.