Ind vs WI: केएल राहुलची शतकी कामगिरी! मोडला विराट कोहलीचा 'हा' विक्रम

भारत आणि वेस्ट इंडिजच्या मालिकेचा पहिला टेस्ट सामना अहमदाबादमध्ये सुरू आहे. पहिल्या डावात कॅरिबियन संघाला 162 धावांवर बाद केल्यानंतर भारताच्या फलंदाजांनी जोरदार कामगिरी सुरू ठेवली आहे. केएल राहुलने शानदार फलंदाजी करत शतक ठोकले. राहुलने 197 चेंडूंचा सामना करत 100 धावांची जबरदस्त पारी खेळली. (Rahul played a brilliant innings of 100 runs off 197 balls)

राहुलने 9 वर्षांनी भारतात टेस्ट क्रिकेटमध्ये शतक पूर्ण केले आहे. त्याने घरच्या मैदानावर शेवटचे शतक 2016 साली ठोकले होते. राहुलच्या या शतकासह वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपमध्ये त्याचे सहावे शतक पूर्ण झाले आहे. यामुळे त्याने विराट कोहलीला मागे सोडले आहे.

कोहलीच्या नावावर वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपमध्ये 5 शतक आहेत. तर राहुलने रिषभ पंत आणि यशस्वी जयस्वाल सोबतही बरोबरी केली आहे. शतक ठोकल्यानंतर राहुलने खास अंदाजात आपले शतक साजरे केले. त्याने यशस्वी जयस्वाल आणि नंतर शुभमन गिलसोबत मिळून महत्वाची भागीदारी केली.

Comments are closed.