डेथ ओव्हर्समध्ये केएल राहुलने रचला इतिहास! ठरला जगातील सर्वात जास्त धावा करणारा तिसरा फलंदाज

केएल राहुलने (KL Rahul) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात 66 धावांची नाबाद खेळी केली, ज्यामुळे टीम इंडियाचा एकूण स्कोअर 350 च्या पार पोहोचला. डेथ ओव्हर्समध्ये (शेवटच्या षटकांमध्ये) राहुल भारतासाठी महत्त्वाच्या धावा बनवत आहे. त्याने पहिल्या सामन्यातही खालच्या फळीत येऊन अर्धशतक (60) झळकावले होते. रायपूरमधील दुसऱ्या वनडे सामन्यात केएल राहुलने 43 चेंडूंमध्ये 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 66 धावांची नाबाद खेळी केली. राहुलच्या आधी या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) आणि ऋतुराज गायकवाड (Ruturaj gaikwad) यांनी शतके झळकावली होती.

2023 नंतर, वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेथ ओव्हर्समध्ये (41 व्या ते 50 व्या ओव्हरपर्यंत) केएल राहुल सर्वाधिक धावा करणारा जगातील तिसरा फलंदाज आहे. तो भारतासाठी चांगला फिनिशर’ झाला आहे. त्याने 142.76 च्या स्ट्राइक रेटने एकूण 424 धावा केल्या आहेत. या यादीत तो सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज आहे.

या यादीत पहिल्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर आहे, ज्याने 168.18 च्या स्ट्राइक रेटने एकूण 464 धावा केल्या आहेत. राहुलच्या मागे न्यूझीलंडचा ग्लेन फिलिप आहे, ज्याने 149.63 च्या स्ट्राइक रेटने 413 धावा केल्या आहेत.

ODI मध्ये 41 ते 50 ओव्हर्स दरम्यान सर्वाधिक धावा (2023 नंतर)

खेळाडू धावा स्ट्राइक रेट
डेव्हिड मिलर 464 168.11
चरिथ असलंका 438 147.97
केएल राहुल ४२४ १४२.७६
ग्लेन फिलिप 413 149.63

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन्ही वनडे सामन्यांत भारतीय फलंदाजांनी जोरदार धावा केल्या आहेत. पहिल्या सामन्यात 349 धावांपर्यंत पोहोचलेल्या टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 358 धावा केल्या. जर आज रायपूरमध्ये भारताने हा स्कोअर वाचवला (Defend केला), तर टीम इंडिया 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेईल.

Comments are closed.