कुटुंबासाठी घेतला कठोर निर्णय, ‘कमबॅक’ला क्लासनचा नकारच

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज हेनरिक क्लासन पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतणार नाही आणि हा निर्णय अंतिम आहे.  34 वर्षीय क्लासनने कुटुंबाला प्राधान्य देत ‘कमबॅक’चा विचार कायमचा बाजूला ठेवला आहे.

गेल्या वर्षी जूनमध्ये केंद्रीय करार न मिळाल्यानंतर क्लासनने सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती. सध्या तो फक्त टी20 लीगमध्ये, विशेषतः सनरायझर्स हैदराबादसाठी मैदान गाजवत आहे.

आयपीएलने शेअर केलेल्या व्हिडिओत क्लासेनने नितीश कुमार रेड्डीशी बोलताना मन मोकळं केलं. ‘दोन आठवडे विचार केला, पण शेवटी ठरवलं की आता पुन्हा येणे नाही, असे क्लासनने ठामपणे सांगितले.

टी20 वर्ल्ड कपदरम्यान मित्रांची कामगिरी पाहून त्याच्या मनात पुनरागमनाची इच्छा निर्माण झाली होती. मात्र, वर्ल्ड कपनंतर परिस्थिती बदलणार नाही हे लक्षात येताच त्याने परतण्याचा विचार सोडून दिला. असे क्लासनने स्पष्ट केले.

Comments are closed.