मला पूर्ण खात्री आहे..! 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीबाबत सुनील गावस्कर यांची मोठी भविष्यवाणी
आयपीएल 2025 स्पर्धेत 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने त्याच्या फलंदाजीने माजी भारतीय कर्णधार सुनील गावस्कर यांचे सुद्धा मन जिंकलं. गावस्कर यांनी वैभवच्या फलंदाजीचे कौतुक करत तसेच 14 वर्षांच्या या खेळाडूंच्या भविष्याबद्दल त्यांचे मत व्यक्त केले आहे. गावस्कर यांनी स्टार स्पोर्ट्सवर वैभव सूर्यवंशी बद्दल भाष्य केले आणि त्याला भारताचा भविष्यातील स्टार म्हटले आहे.
स्टार स्पोर्ट्स एका शोमध्ये जेव्हा गावस्कर यांना विचारण्यात आले की, आयपीएल 2025 मधील सर्वात आठवणीत राहील, असा क्षण कोणता होता? या प्रश्नावर पूर्व भारतीय दिग्गज यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की, माझ्यासाठी 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची फलंदाजी अद्भुत राहिली आहे. ज्या 14 वर्षांच्या वयामध्ये त्याने मैदानावर शतक झळकावले. त्या वयामध्ये तर लहान मुले स्वप्नात शतक झळकावतात. पण आणि खरोखर मैदानात उतरून शतक झळकावले आहे.
ते पुढे म्हणाले, वैभवचं शतक आयपीएल मधील सर्वात आठवणीत राहणारा क्षण होता. मला पूर्ण खात्री आहे की, तो पुढेही अशीच फलंदाजी करेल आणि खूप धावा करेल. मला वाटते की, त्याने भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळावं.
आयपीएल 2025 मध्ये वैभवने गुजरात टायटन्स विरुद्ध सामन्यात शानदार फलंदाजी करत 38 चेंडूत 101 धावा करून इतिहास रचला. आयपीएलदरम्यान त्याने त्या सर्व गोलंदाजांविरुद्ध आक्रमक फलंदाजी करत त्याच्या फलंदाजीची जादू दाखवली. ज्या गोलंदाजांना दुनियेतील सर्वात चांगला गोलंदाज मानले जाते, मग तो भुवनेश्वर कुमार असेल, किंवा रशीद खान. या सर्व गोलंदाजांसमोर या 14 वर्षांच्या फलंदाजाने त्याच्या फलंदाजीने सर्वांना अडचणीत टाकले.
वैभवने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये 5 सामने खेळले आहेत आणि या दरम्यान त्याने 155 धावा केल्या आहेत. यामध्ये 16 षटकार आणि 10 चौकार त्याने आतापर्यंत झळकावले आहेत.
Comments are closed.