स्वत:चे स्थान ओळखत गवसणी घाला

दोन्ही पांढरे पंख आकाशात चरतात? संपूर्ण स्थिर डोक्यात नेहमी माशांच्या भूतांमध्ये राहतात.
बदकातील चंद्राचे सर्व किंचित जास्त गुण म्हणजे चंद्र. ते स्थळ मानतात आणि स्थानाशिवाय नाहीत?

बगळा आणि चंद्र यांच्यामध्ये तुलना केली आहे. अशी तुलना का करण्यात आली आहे? तर याचे कारण त्यांच्यात अनेक गुण समान आहेत. कोणते गुण समान आहेत? तर दोघेही शुभ्र पांढरे आहेत. दोघांची आकाशातील गती ही न रोखता येणारी आहे. इथे बगळ्याला पक्ष म्हणजे पंख आहेत. तर चंद्राला पंधरवडा या अर्थाने पक्ष आहे. बगळा मीनाचा म्हणजे माशाचा उपभोग घेतो तर चंद्र मीन राशीचा ! चंद्र स्थाणु म्हणजे भगवान शंकर यांच्या मस्तकी विराजमान आहे तर बगळा स्थाणु म्हणजे झाडाच्या डोक्यावर दबा धरून बसलेला असतो. बगळ्याच्या ठिकाणी याप्रमाणे चंद्राचे सर्व गुण आहेत. पण त्याचा काय उपयोग? जो उच्च स्थानी असतो त्यालाच महत्त्व प्राप्त होते. ज्याला स्वतचे स्थान नाही म्हणजेच समाजात महत्त्वाचा हुद्दा नाही त्याच्या गुणांची कदर कोणीही करत नाही. देवळाच्या पायरीचा दगड आणि मूर्तीचा दगड दोन्ही दगडच, पण त्यांच्या महत्त्वात केवढा फरक पडतो. कारण मूर्तीच्या दगडाला उच्च स्थान प्राप्त झालेले असते.?

समीरा गुजर-जोशी डॉ

Comments are closed.