विराट कोहलीला समजावण्यासाठी BCCIचा प्रयत्न सुरू, क्रिकेटचा किंग परत येणार?
टीम इंडियाला पुढच्या महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जायचे आहे. या दौऱ्यावर भारताला यजमान संघ इंग्लंड विरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या चक्र अंतिम सामन्यानंतर काही दिवसात ही मालिका सुरू होणार आहे. 2021 मध्ये कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडिया गेली होती. जी मालिका 2-2 बरोबरीने संपली होती. त्यानंतर कोविड-19 च्या महामारीनंतर त्या दौऱ्याचा शेवटचा सामना 2022 मध्ये झाला होता, जो इंग्लंडने 7 विकेट्सने जिंकला होता.
आता इंग्लंड दौऱ्याआधी एक मोठी अपडेट समोर आली आहे, ज्याने चाहत्यांना धक्का बसला आहे, रिपोर्टनुसार माजी कर्णधार विराट कोहली कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तसेच विराटने स्वतः ही माहिती बीसीसीआयला दिलेली आहे. परंतु विराटने निवृत्ती घ्यावी असे बीसीसीआयला मुळीच वाटत नाही. किंग कोहलीने यावेळी कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती घेणे योग्य नाही. कारण इंग्लंड दौऱ्यावर त्याच्या अनुभवाची सर्वात जास्त गरज भारतीय संघाला आहे.
त्यामुळे बीसीसीआय या पूर्ण विषयावर निर्णय घेई. बोर्ड या विषयावर विराटची चर्चा करू शकतो. क्रिकबजच्या रिपोर्टनुसार, भारतीय क्रिकेटमध्ये एका प्रभावशाली व्यक्तीला ही जबाबदारी देण्यात आलेली आहे. की त्याने विराट कोहलीला निवृत्तीचा निर्णय मागे घेण्यास समजून सांगावे.
विराट कोहली सोबत ही मीटिंग कसोटी संघ निवडण्याआधी होण्याची शक्यता आहे. कसोटी संघाची निवड (23 मे) शुक्रवार रोजी होणार आहे. तसेच बीसीसीआयने नवीन कसोटी कर्णधार घोषणा करण्यासाठी प्रेस कॉन्फरन्स सुद्धा आयोजित केली जाणार आहे.
बीसीसीआय विराट कोहलीला समजावण्यात यशस्वी होईल की नाही हे सांगणे कठीण आहे. पण आशा आहे की, विराटला समजावण्यासाठी सांगितलेल्या व्यक्तीचा त्याच्यावर प्रभाव पडेल. बीसीसीआय हे कारण सुद्धा जाणून घेऊ इच्छिते की विराट अचानक हा फॉरमॅट सोडण्याचा विचार का करत आहे.
विराट कोहली कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावांचा आकडा पार करण्याच्या जवळ पोहोचला आहे. तो हा विक्रम करण्यापासून 770 धावा दूर आहे, त्याने आतापर्यंत 121 कसोटी सामने खेळले आहेत. त्याने यादरम्यान 9230 धावा केल्या आहेत. त्यामध्ये 30 शतक आणि 31 अर्धशतकांचा समावेश आहे.
Comments are closed.