कोहलीची मैदानात एन्ट्री! नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात चाहत्यांना मिळणार आनंदाची बातमी
विराट कोहलीने विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मध्ये दिल्ली क्रिकेट संघासाठी पहिले दोन सामने खेळताना अतिशय शानदार कामगिरी केली, ज्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सध्या कोहली न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेची तयारी करत असून नवीन वर्षानिमित्त तो सुट्टीवर आहे. मात्र, नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच किंग कोहलीने चाहत्यांना एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे.
क्रिकबझच्या अहवालानुसार, कोहली 11 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेपूर्वी स्वतःचा सराव अधिक मजबूत करण्यासाठी (6 जानेवारी) रोजी रेल्वेविरुद्ध एक ‘लिस्ट ए’ सामना खेळण्याची शक्यता आहे. या संदर्भात डीडीसीएशी चर्चा झाली असून, कोहली ज्या फॉर्मात आहे ते पाहता रेल्वेचा संघ आतापासूनच दबावाखाली असेल.
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेनंतर कोहली थेट जून किंवा जुलैमध्ये भारतीय संघातून खेळताना दिसेल, परंतु त्याआधी तो दोन महिने आयपीएलमध्ये आरसीबीसाठी मैदानात उतरेल. कोहलीने कसोटी आणि टी20 क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यामुळे, त्याचे संपूर्ण लक्ष आता 2027 च्या वनडे वर्ल्ड कपवर आहे. या ध्येयाला समोर ठेवून तो या वर्षातील सर्व 15 वनडे सामने आणि प्रत्येक लहान-मोठी आंतरराष्ट्रीय मालिका खेळण्यासाठी उत्सुक आहे
Comments are closed.