Kolhapur Accident – कार चालकाला हृदयविकाराचा झटका, 10 गाड्यांना दिली धडक

कोल्हापुरात एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. काल चालवत असतानाच चालकाला हृदयविकाराचा झटका आला. यामुळे कार अनियंत्रित झाली आणि 10 गाड्यांना धडक देत कारचालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी पहाटे ही घटना घडली. धिरज पाटील (55) असे मयत चालकाचे नाव आहे.

धिरज पाटील हे एमजी विंडसर कार चालवत होते. एका फ्लायओव्हरजवळ येताच पाटील यांना हृदयविकाराचा झटका आला. यामुळे पाटील यांची कार अनियंत्रित झाली. अनियंत्रित कारने रिक्षा, कार, दुचाकींना अशा 10 वाहनांना धडक दिली. अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले. पादचारी आणि वाहनचालक अपघातातून थोडक्यात बचावले. वाहनांना धडक दिल्यानंतर पाटील यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

पाटील यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. शवविच्छेदन अहवालात अपघातापूर्वी पाटील यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यामुळे त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात झाल्याचे निष्पन्न झाले.

Comments are closed.