Kolhapur News – शिवशंभूद्रोही कोरटकर आणि केशव वैद्य यांच्यावर कारवाई करा, मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या नागपूरच्या शिवशंभूद्रोही प्रशांत कोरटकर आणि केशव वैद्यला अटक करण्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडी आणि शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. खानविलकर चौकात इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि शिवप्रेमींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला.
आक्रमक झालेल्या इंडिया आघाडी आणि शिवप्रेमी पदाधिकाऱ्यांना सकाळपासून ताब्यात घेऊन नजरकैदेत ठेवण्यात आले होते. भाजप कार्यालयाच्या शेजारी असलेल्या खानविलकर चौकात सायंकाळी इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि शिवप्रेमींनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांशी झटापाट झाली असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी कोरटकरसह मुख्यमंत्र्यांच्या विरोधातही जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते.
छत्रपतींचा अवमान करणाऱ्या कोरटकर आणि सोलापूरकर यांना अटक करा! विधान परिषद सभागृहात विरोधकांचा ठिय्या
Comments are closed.