चीन बॉर्डरवर अरुणाचलमध्ये रस्ता बनविताना सैन्यदलाच्या वाहनाचा अपघात, कोल्हापूरच्या जवानाला वीरमरण

चीन बॉर्डरवर अरुणाचलमध्ये रस्ता बनविताना सैन्यदलाचे वाहन 400 ते 500 फूट खोल दरीत कोसळल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात कोल्हापूरचे जवान सुनिल विठ्ठल गुजर यांना वीरमरण आले. त्यामुळे जिल्ह्यासह गुजर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसलळा आहे.
जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुनिल गुजर सन 2019 मध्ये सैन्यदलात भरती झाले होते. 110 इंजिनीयर रेजिमेंट बॉम्बे इंजिनियर ग्रुपचे जवान सुनील गुजर हे डोजर ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. गुरुवारी 13 मार्च रोजी दुपारी चायना बॉर्डरवर अरुणाचलमध्ये रोड कटिंग करताना, त्यांचा डोजर स्लाइडिंग होऊन 400 ते 500 फूट खाली कोसळला. त्या अपघातात सुनिल गुजर यांना वीरमरण आले. त्यांचे पार्थिव शुक्रवारी (14 मार्च) संध्याकाळपर्यंत अरुणाचल दिब्रुगड येथील आरोचमध्ये येईल. त्यानंतर त्यांच्या कोल्हापूर येथील मूळ गावी येईल. वीरजवान सुनील गुजर यांच्या पश्चात पत्नी स्वप्नाली आणि पाच महिन्यांचा लहान मुलगा व भाऊ असा परिवार आहे.
Comments are closed.