कोलकाताच्या नाझिराबादमध्ये भीषण आग, 7 जणांचा मृत्यू, अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी

कोलकाता: पश्चिम बंगालच्या कोलकाता येथील नाझिराबादमध्ये एका गोदामाला आग लागली. या आगीत 7 जणांचा मृत्यू  झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.अग्निशमन दलाकडून  2 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. नातेवाईकांच्या माहितीनुसार 20 जण बेपत्ता आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार दुपारी तीन वाजता ड्राय फूडच्या गोदामात आग लागली. अग्निशमन दलाच्या  15 गाड्या घटनास्थळी आग विझवण्यासाठी दाखल झाल्या आहेत.

गोदामाला लागलेली आग इतरत्र पसरली

अग्निशमन दलानं आगीवर थोड्या प्रमाणात नियंत्रण मिळवल्यानंतर गॅस कटर घेत इमारतीत गेले. आनंदपूरच्या नाझिराबादमधील गोदामात प्रामुख्यानं कोरड्या स्वरुपाची खाद्य पदार्थाची पॅकेटस आणि सॉफ्ट ड्रिंक्सच्या बाटल्या होत्या. अग्निशमन दलाच्या माहितीनुसार आग दोन गोदामांमध्ये पसरली. यामुळं सर्व काही जळून खाक झालं.

अग्निशमन दलाला या आगीसंदर्भात माहिती मिळाली होती. मात्र, गोदाम अरुंद रस्ता असणाऱ्या ठिकाणी असल्यानं अग्निशमन दलाच्या वाहनांना घटनास्थळापर्यंत पोहोचण्यास अडचणी निर्माण झाल्या यामुळं आगीवर नियंत्रण आणण्यात वेळ लागला.

पश्चिम बंगालचे ऊर्जा मंत्री अरुप विश्वास घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतांच्या नातेवाईकांचं सांत्वन केलं.  याशिवाय त्यांच्याकडून बचाव कार्याचा आढावा घेण्यात आला. आगीच्या घटनेत ज्यांचे नातेवाईक बेपत्ता आहेत त्यांच्या नातेवाईकांसोबत अरुप विश्वास यांनी चर्चा केली. मंत्री अरुप विश्वास यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस आणि अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण आणण्याचं काम सुरु आहे. आगीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात आल्याची माहिती देत फायर फायटर्स इमारतीत दाखल झाल्याची माहिती त्यांनी दिली. अरुप विश्वास यांनी ही राजकारण करण्याची वेळ नाही, पोलीस आणि अग्निशमन दलाला त्यांचं काम करु देण्याची वेळ असल्याचं म्हटलं.

गोदामात आग कशामुळं लागली हे स्पष्ट झालेलं नाही. रात्रीच्या ड्युटीवर असणारे कर्मचारी आत अडकले होते. याशिवाय सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारे सहा लोक देखील आत अडकल्याची माहिती आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार गोदाम बाहेरुन बंद होतं, त्यामुळं लोक आत जाऊ शकले नाहीत.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.