घाटिवळे येथील रेल्वे ट्रॅकजवळ नेपाळी तरुणाचा मृतदेह आढळला

कोकण रेल्वे मार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील घाटीवळे येथील रेल्वे ट्रॅकच्या लगत असणाऱ्या गटारात एका अनोळखी सुमारे पंचवीस नेपाळी तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. सदर तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने कवटी फुटून मेंदू बाहेर पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी ७.४५ वाजता उघडकीस आली.
याबाबतची खबर पोलीस पाटील दिपक लक्ष्मण कांबळे यांनी साखरपा पोलिसांना दिली असता साखरपा पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, सहाय्यक पोलीस फौंजदार शांताराम पंदेरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय करंडे, पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील कांबळे यांनी घटनास्थळी त्वरित जाऊन मृतदेहाची पाहणी केली व पंचनामा करून मृदेह शविच्छेदनासाठी साखरपा प्राथमिक आरोग्केंद्रात आणण्यात आले आहे. असता त्यांच्या खिशात चेक बुक मिळाले असून चेकबुकवर लक्ष्मी गीरी साम दिलमया गीरी असे नाव लिहिलेले होते, मात्र निश्चित नाव काय याचा उलगडा झाला नाही.
देवरुखचे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी घटनस्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या त्याची उंची पाच फूट पाच इंच, रंग गोरा अंगावर जीन्स पॅन्ट व काळे फुल शर्ट घातलेले होते. जिल्ह्यात कामासाठी आलेल्या व ज्यांच्याकडे नेपाळी माणसे कामाला आहेत त्यांना याची माहिती मिळाल्यास साखरपा पोलीस स्टेशन व देवरुख पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले असून पोलीस कार्यवाही सुरु आहे.

Comments are closed.