कोकण रेल्वेत 201 जागांसाठी भरती
नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगार तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोकण रेल्वेत वेगवेगळ्या पदांसाठी 201 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अखेरची तारीख 28 सप्टेंबर 2026 आहे. याच महिन्यात परीक्षा होणार आहे. या भरतीसंबंधी सविस्तर माहिती https://cdn3.digialm.com या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. ज्युनियर इंजिनीअर (सिव्हील)-25, ट्रक मेंटेनर-57, सिनियर सेक्शन इंजिनीअर-05, ईएसटीएम-3-15, सेक्शन कंट्रोलर-09, स्टेशन मास्टर-15, गुड्स ट्रेन मॅनेजर-10, असिस्टंट लोको पायलट-30, सिनियर सेक्शन इंजिनीअर (मॅकेनिकल)-06, ज्युनियर इंजिनीअर (मॅकेनिकल)-07, टेक्निशियन-3-15, कमर्शियल सुपरवायझर-07 जागा भरल्या जाणार आहेत.
Comments are closed.